'मंगलम दंगलम'मालिकेत संजीव सकलेचाला या गोष्टीमुळे बसतो आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 14:34 IST2018-11-22T14:31:38+5:302018-11-22T14:34:19+5:30
संजीव सकलेचा आपल्या लाडक्या मुलीला त्याला आवडत नसलेल्या व्यक्तीसोबत घरात एकटे पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय असणार हे मिळणार आहे.

'मंगलम दंगलम'मालिकेत संजीव सकलेचाला या गोष्टीमुळे बसतो आश्चर्याचा धक्का
सोनी सबवर नवीनच सुरू झालेली 'मंगलम दंगलम – कभी प्यार कभी वार' मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली आहे. खास बाब म्हणजे अभिनेते मनोज जोशी त्यांची रंगभूमीवरील कौशल्ये येथेही दाखवत सर्वोत्तम अभिनय सादर करत आहेत. मालिकेच्या आगामी एपिसोड्समध्ये रुमी व अर्जुन एका दुविधेमध्ये सापडतात. रुमी व अर्जुनला घरामध्ये एकटे पाहून संजीव नाराज होतो. यामधून संशय निर्माण होतो की, दोघांमध्ये एकमेकांविषयी प्रेमभावना असू शकते.
संजीव सुशिलाला हे सांगत चिडवत असल्याचे पाहून घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो की, तिने रुमीसाठी भावी वराचा शोध घ्यावा. याबाबत काहीच माहीत नसलेली रुमी दादीसाठी सरप्राइज बथर्ड पार्टीचे आयोजन करते. घरात कुटुंबातील कोणीच नसताना रुमी तिच्या घरी लावण्य व अर्जुनला बोलावण्याचे ठरवते, ज्यामुळे दोघांनाही एकमेकांसोबत चांगला वेळ व्यतित करता येईल. पण संजीव लवकर घरी आल्यानंतर याला वेगळेच वळण मिळते.
मालिकेमध्ये संजीव सकलेचाची भूमिका साकारणारे मनोज जोशी म्हणाले, ''मला 'मंगलम दंगलम'मध्ये संजीव सकलेचाची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. वास्तविक जीवनात मला मुलगी असावी अशी माझी नेहमीच इच्छा होती. म्हणूनच या मालिकेमध्ये वडिलाची भूमिका साकारण्यास मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. या निमित्ताने माझी इच्छाही पूर्ण झाली आहे. संजीव सकलेचा आपल्या लाडक्या मुलीला त्याला आवडत नसलेल्या व्यक्तीसोबत घरात एकटे पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय असणार हे मिळणार आहे.''