संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकरचं अपहरण! व्हिडिओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 12:21 PM2024-06-04T12:21:37+5:302024-06-04T12:22:08+5:30

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. संकर्षण आणि अमृताचं अपहरण झालं आहे. याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. नक्की काय प्रकरण आहे?

sankarshan karhade and amruta khanvilkar gets kidnap zee marathi new serial promo out | संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकरचं अपहरण! व्हिडिओ आला समोर

संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकरचं अपहरण! व्हिडिओ आला समोर

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. संकर्षण आणि अमृताचं अपहरण झालं आहे. याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. पण, त्यांचं खरंखुरं अपहरण झालं नसून एका नव्या मालिकेचा हा प्रोमो आहे. झी मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवरुन हा प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकर दिसणार आहेत. या मालिकेच्या प्रोमोमध्ये शूटिंग करत असलेल्या संकर्षण कऱ्हाडेचं अपहरण होत असल्याचं दिसत आहे. तर व्हॅनिटी व्हॅनमधून उतरलेल्या ग्लॅमरस अमृतालाही किडनॅप करताना एक व्हॅन दिसत आहे. त्यानंतर दोघांनाही एकाच ठिकाणी बांधून ठेवण्यात आल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या नव्या मालिकेच्या प्रोमोमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 

"दोन नामवंत मराठी कलाकारांचं अपहरण..! कोणी घडवून आणलंय हे सांर.. समजणार लवकरच...", असं म्हणत झी मराठीच्या ऑफिशियल पेजवरुन हा प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या मालिकेचं नाव अद्याप गुलदस्त्यात असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेसाठी प्रेक्षकही उत्सुक असल्याचं दिसत आहे. 

Web Title: sankarshan karhade and amruta khanvilkar gets kidnap zee marathi new serial promo out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.