‘माझी तुझी रेशीमगाठ' फेम समीर होतोय लंडनमध्ये शिफ्ट?, संकर्षणच्या फोटोवरून होईल उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 04:33 PM2022-06-15T16:33:15+5:302022-06-15T16:42:10+5:30
mazi tuzi reshimgath : संकर्षण ‘माझी तुझी रेशीमगाठ” मालिका सोडून अचानक लंडनला का जातोय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ”ही मालिका रसिकांची आवडती मालिका बनली आहे.समीर ही भूमिका अभिनेता संकर्षण कर्हाडे (Sankarshan Karhade)ने साकारली आहे.संकर्षणचाही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर तो फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. सध्या संकर्षणने इन्स्टाग्रामवर टाकलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.
संकर्षणने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट व्हायरल होतेय. संकर्षणने शेअर केलेल हे फोटो एअरपोर्टवरचे आहेत. फोटोवरून संकर्षण नेमका कुठे निघाला असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. संकर्षण लंडनमध्ये गेलाय. दोस्तांनो .. लंडनला जाउन येतो .. “तूम्हणशीलतसं आणि सारखं काहीतरी होतंय” ह्या दोन्ही मी लिहिलेल्या नाटकांचे २/२ प्रयोग आहेत.. शुभेच्छा पाठीशी कायम असु द्या. असं कॅप्शन त्याने या फोटोंसोबत दिलं आहे. हॅप्पी जर्नी आणि ऑल द बेस्ट अशा शब्दांत चाहत्यांनी त्याला नाटकांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
परभणीचं नाव मनोरंजन विश्वात गाजवणारा अभिनेता म्हणजे संकर्षण. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार या झी मराठीच्या कार्यक्रमात 2008 ला तो दिसला होता. ‘माझीया प्रियाला’ आणि ‘आभास हा’ या मालिकांमध्ये संकर्षणने काम केले आहे. झी मराठीवरील ‘रामराम महाराष्ट्र’चे सूत्रसंचालनही त्याने केलं.
यासोबतच लोभ असावा, मी रेवती देशपांडे या लता नार्वेकर यांच्या व्यावसायिक नाटकात संकर्षण होता. संकर्षण त्याच्या उत्तम अभिनयासोबतच सर्वात जास्त चर्चेत असतो ते त्याच्या जबरदस्त कवितांमुळे. त्यानं लिहिलेल्या कविता त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना नेहमीच विचांर करायला भाग पाडतात. त्याच्या लेखनीची जादू त्याच्या एका पेक्षा एक अशा लयभारी कवितांमधून पाहायला मिळते.