अहमदनगरची सन्मिता धापटे शिंदे ठरली सूर नवा ध्यास नवाची विजेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 11:54 IST2021-06-14T11:51:47+5:302021-06-14T11:54:47+5:30
रश्मी मोघे, राधा खुडे, प्रज्ञा साने, संपदा माने आणि श्रीनिधी देशपांडे या उत्तम गायनकौशल्य असणाऱ्या स्पर्धकांवर मात करत सन्मिताने महागायिका होण्याचा मान पटकावला आहे.

अहमदनगरची सन्मिता धापटे शिंदे ठरली सूर नवा ध्यास नवाची विजेती
कलर्स मराठी वाहिनीवरील 'सूर नवा ध्यास नवा- आशा उद्याची' या रिएलिटी शोचा अंतिम सोहळा 13 जूनला रविवारी पार पडला. यात विजेता कोण ठरणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. अहमदनगरची सन्मिता धापटे शिंदे या पर्वाची विजेती ठरली.
महाराष्ट्राच्याच नाही तर भारतभरातून सूर नवा ध्यास नवा स्पर्धेत उतरलेल्या गायिकांमधून १६ सुरेल गायिका सूर नवा ध्यास नवाच्या देदीप्यमान अशा महामंचावर दाखल झाल्या. कोरोनाच्या या कसोटीच्या परिस्थितीला तोंड देत या १६ जणींनी सुरांचा हा मंच मोठ्या मेहनतीने सजवला, गाजवला आणि अधिकाधिक तेजोमय केला. या १६ सुरेल गायिकांमधून सहाजणींनी महाअंतिम फेरीत मानाचं स्थान मिळवलं. अहमदनगरची सन्मिता धापटे शिंदेने परीक्षकांसोबतच लोकांचे मन जिंकत विजेतेपद मिळवले.
रश्मी मोघे, राधा खुडे, प्रज्ञा साने, संपदा माने आणि श्रीनिधी देशपांडे या उत्तम गायनकौशल्य असणाऱ्या स्पर्धकांवर मात करत सन्मिताने महागायिका होण्याचा मान पटकावला आहे.