'संत गजानन शेगावी'मधील ही चिमुरडी आहे प्रसिद्ध अभिनेत्रीची लेक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 02:29 PM2022-02-09T14:29:19+5:302022-02-09T14:31:24+5:30

'संत गजानन शेगावी' ('Sant Gajanan Shegavi') मालिकेत या चिमुरडीने नर्मदाची भूमिका साकारली आहे.

'Sant Gajanan Shegavi' fame this kid is the daughter of famous actress | 'संत गजानन शेगावी'मधील ही चिमुरडी आहे प्रसिद्ध अभिनेत्रीची लेक

'संत गजानन शेगावी'मधील ही चिमुरडी आहे प्रसिद्ध अभिनेत्रीची लेक

googlenewsNext

सन मराठी या नव्या वाहिनीवरील संत गजानन शेगावी('Sant Gajanan Shegavi')चे ही अध्यात्मिक मालिका रसिकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत संत गजानन महाराजांची भूमिका अभिनेता अमित फाटक याने साकारली आहे. आतिष मोरे, मयूर खांडगे, प्रतिमा देशपांडे, संजीव तांडेल, अक्षय टाक, पूजा नायक, राजश्री निकम हे कलाकार या मालिकेत आहेत. या मालिकेत प्रथमच एका बालकलाकार मुलीसोबत तिची आई देखील पाहायला मिळत आहे. अनेकांना हे माहित नसेल  की मालिकेत रील लाईफ माय लेकीची भूमिका निभावत असलेल्या सत्यभामा आणि नर्मदा या दोघी मायलेकी खऱ्या आयुष्यात देखील त्यांच्यात माय लेकीचंच नातं आहे.

संत गजानन शेगावी या मालिकेत सत्यभामाची भूमिका खाष्ट सासूची आहे जी तिच्या सुनेला म्हणजेच जानकीला नाहक त्रास देणारी आहे. मात्र सत्यभामाची लेक नर्मदा ही तिच्या वाहिनीच्या बाजूने असलेली पाहायला मिळते. सत्यभामाची भूमिका विरोधी अभिनेत्री पूजा नायक हिने साकारली आहे. अभिनेत्री पूजा नायक (Pooja Nayak) यांची मुलगी राधा नायक (Radha Nayak) ही देखील याच मालिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.


अभिनेत्री पूजा नायकने अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पिकूली, अथांग, छोटी मालकीण, बकाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नऊ महिने नऊ दिवस, बिस्कीट, तू माझा सांगाती, एक हजाराची नोट, सावित्री जोती या मालिका आणि चित्रपटातून विरोधी तर कधी सहाय्यक भूमिका तिने साकारल्या आहेत. तिच्याच पावलावर पाऊल टाकत तिची दहा वर्षांची लेक राधा नायक हिने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. 

Web Title: 'Sant Gajanan Shegavi' fame this kid is the daughter of famous actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.