या कारणामुळे सारा खानने इंडियन आयडॉल 10 मध्ये लावली हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 21:30 IST2018-12-14T21:30:00+5:302018-12-14T21:30:02+5:30
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात सिम्बा या आगामी चित्रपटाचे कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत. रणवीर सिंग, सारा अली खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या कार्यक्रमासाठी नुकतेच चित्रीकरण केले.

या कारणामुळे सारा खानने इंडियन आयडॉल 10 मध्ये लावली हजेरी
इंडियन आयडॉलच्या या सिझनला देखील प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळत आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक सरस गाणी सादर करत आहेत. आता खूपच कमी स्पर्धक शिल्लक असून या मधून कोण विजेता ठरतोय याची सगळयांना उत्सुकता लागलेली आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तसेच या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात.
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात सिम्बा या आगामी चित्रपटाचे कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत. रणवीर सिंग, सारा अली खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या कार्यक्रमासाठी नुकतेच चित्रीकरण केले. सिम्बा हा सारा अली खानचा दुसरा चित्रपट असून काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या केदारनाथ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक होत आहे.
सारा आता तिच्या दुसर्या बॉलीवुड चित्रपटासाठी सज्ज झाली असून या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन ती सध्या करत आहे. इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या मंचावर केवळ रणवीर आणि रोहित शेट्टी जाणार असे आधी ठरले होते. पण साराला याबाबत कळल्यानंतर तिने लगेचच रोहितशी संपर्क साधला आणि इंडियन आयडॉल 10 च्या सेटवर तिला देखील यायचे असल्याचे सांगितले. रोहितने याविषयी सांगितले की, सारा या कार्यक्रमाची परीक्षक नेहा कक्कडची मोठी चाहती आहे आणि तिच्यामुळेच साराला या कार्यक्रमात यायची इच्छा होती.
सारा या शोमध्ये दुसर्यांदा दिसणार आहे. ती या कार्यक्रमात केवळ नेहासाठी आली आहे. नेहाने गायलेले ‘सीटी बजाए’ हे रीमिक्स गाणे तिला खूप आवडते. साराने रणवीर आणि मनिष पॉलच्या साथीने नेहाबरोबर या गाण्यावर नृत्य देखील केले. सारा आपली चाहती आहे हे कळल्यावर नेहाला खूपच आश्चर्य वाटले असल्याचे तिने सांगितले. पण याचसोबत केदारनाथ बघितल्यानंतर मी साराची चाहती झाले आहे असे नेहाने आवर्जून सांगितले.
इंडियन आयडॉल 10 ची उपांत्य फेरी प्रेक्षकांना येत्या शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे.