"मला प्रोडक्शन कडून कॉल आला अन्.." , 'सारं काही तिच्यासाठी'मधील श्रीनूला अशी मिळाली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 06:00 PM2023-10-06T18:00:30+5:302023-10-06T18:14:00+5:30

या मालिकेत श्रीनूची भूमिका साकारणाऱ्या अभिषेक गावकर यांनी अलिकडेच त्याच्या भूमिकेविषयी भाष्य केलं आहे.

Sara kahi tichyasathi fame abhishek gaonkar relieved about his role | "मला प्रोडक्शन कडून कॉल आला अन्.." , 'सारं काही तिच्यासाठी'मधील श्रीनूला अशी मिळाली भूमिका

"मला प्रोडक्शन कडून कॉल आला अन्.." , 'सारं काही तिच्यासाठी'मधील श्रीनूला अशी मिळाली भूमिका

googlenewsNext

छोट्या पडद्यावर सध्या 'सारं काही तिच्यासाठी' ही नवी मालिका चर्चेत  आहे. ही गोष्ट आहे २ सख्ख्या बहिणींची ज्या गेले २० वर्ष एकमेकींना भेटल्या नाहीत. या मालिकेत खुशबू तावडे आणि शर्मिष्ठा राऊत या मुख्य भूमिकेत झळकल्या आहेत. त्यांच्यासोबत अभिनेता अशोक शिंदे हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. या मालिकेत श्रीनूची भूमिका साकारणाऱ्या अभिषेक गावकर यांनी अलिकडेच त्याच्या भूमिकेविषयी भाष्य केलं आहे.

अभिषेक गावकर म्हणाला, मला प्रोडक्शन कडून कॉल आला ऑडिशनसाठी जे स्क्रिप्ट होत ते मालवणीत होत ते बघून मला खूप आनंद झाला कारण मी कणकवलीचा असल्यामुळे माझ्यासाठी तो प्लस पॉईंट होता. पण सगळ्याच लोकांना मालवणी भाषा कळेलच असं नाही म्हणून ह्या मालिकेत काही लोकांचे डायलॉग मालवणीत केले आहेत आणि काही मराठीत. 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका कोकणातली कथा असून माझ्या मनात हा प्रोजेक्ट करायची खूप इच्छा होती व ती पूर्ण झाली.  मी वाट बघत होतो केव्हा चित्रीकरण सुरू होईल कारण कमाल कथानक, उत्तम संवाद तसेच सहकलाकार ह्या सर्व गोष्टीं मूळे आमचा हा प्रवास खूप छान सुरू आहे. 

पुढे तो म्हणतो, या मालिकेत मी आधी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे . 'सारं काही तिच्यासाठी' ह्या मालिकेत मला एक महत्वाची भूमिका साकारायला मिळतेय. ह्या मालिकेत एक कुटुंब दाखवलं आहे आणि त्या कुटुंबाचा मी पण एक महत्वाचा भाग आहे. या मालिकेत प्रत्येक पात्राच्या काही भूमिका आणि तत्व आहेत जी प्रत्येक कुटुंबात असतातच. हीच गोष्ट मला जास्त आवडली. माझ्या भूमिकेचं नाव आहे 'श्रीनिवास सावंत' आणि मला प्रेमाने सगळे ‘श्रीनू’ म्हणतात. दादा मामा म्हणजेच रघुनाथ राव (अशोक शिंदे) हे श्रीनूसाठी आदर्श आहेत कारण त्याला त्यांचा खूप आदर आहे. रघुनाथ रावांचे तत्व व विचार श्रीनूला आपलेसे वाटतात आणि तो तसाच वागतो. दादामामा आणि श्रीनू मध्ये फरक एवढाच आहे की, श्रीनू खुप बोलका आहे आणि घरात प्रत्येकाची बाजू काय आहे हे श्रीनिवासला माहिती आहे. ह्या भूमिकेसाठी मी तयारी पण खूप छान केली होती. ही पहिली मालिका अशी आहे ज्यात माझा लव्ह अँगल पण दाखवला आहे, ह्या आधीच्या मालिकांमध्ये बरेच नेगेटिव्ह आणि व्हिलन शेड्स होत्या.

Web Title: Sara kahi tichyasathi fame abhishek gaonkar relieved about his role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.