​सरस्वती या मालिकेत संग्राम साळवीची होणार रिएंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 04:15 PM2016-12-28T16:15:39+5:302016-12-28T16:15:39+5:30

देवयानी या मालिकेमुळे नावारूपाला आलेला संग्राम साळवी काही दिवसांपूर्वी सरस्वती या मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने खलनायकाची भूमिका ...

Saraswati will participate in this series Sangram Salvi Renaissance | ​सरस्वती या मालिकेत संग्राम साळवीची होणार रिएंट्री

​सरस्वती या मालिकेत संग्राम साळवीची होणार रिएंट्री

googlenewsNext
वयानी या मालिकेमुळे नावारूपाला आलेला संग्राम साळवी काही दिवसांपूर्वी सरस्वती या मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. 
देवयानी या मालिकेतील तुमच्यासाठी कायपण हा त्याचा संवाद चांगलाच गाजला होता. या संवादावरून अनेक फेसबुक पेजेसही बनवण्यात आली होती. सरस्वती या मालिकेतीलदेखील तुम्ही बोलायचं... आणि आम्ही ऐकायचं हा संवाद प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.
संग्रामने सरस्वती या मालिकेत निगेटिव्ह भूमिका जरी साकारली असली तरी प्रेक्षकांनी ही भूमिका डोक्यावर घेतली होती. पण काही दिवसांपासून संग्राम साकारत असलेली सर्जेराव चौधरीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळत नाहीये. पण आता लवकरच संग्रामची या मालिकेत रिएंट्री होणार आहे. 
संग्राम गेल्या काही दिवसांपासून मालिकेत दिसत नसला तरी त्याची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. आता सरस्वती या मालिकेत प्रेक्षकांना एक वेगळा संग्राम पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील त्याचा लूक हा खूपच वेगळा असणार आहे. त्याची वेशभूषा आणि हेअर स्टाइदेखील पूर्णपणे वेगळी असणार आहे. प्रेक्षकांना संग्रामचा हा लूक आवडेल अशी त्याला खात्री आहे. 
सरस्वती आणि मोठे मालक म्हणजेच राघव यांचा संसार उद्धवस्त करण्याचा त्याचा हेतू अजूनही कायम आहे. त्याच्या कपटी आणि कारस्थानी विचारसरणीत काडीमात्रही बदल झालेला नाही. त्यामुळे सर्जेराव सरस्वती आणि राघव यांच्या नुकत्याच सुरळीत सुरू झालेल्या जीवनात काही अडचणी निर्माण करतो का हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.


Web Title: Saraswati will participate in this series Sangram Salvi Renaissance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.