साताजन्माच्या गाठी! मुग्धा-प्रथमेश अडकले लग्नाच्या बेडीत, विवाहसोहळ्यातील पहिला फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 15:10 IST2023-12-21T15:09:43+5:302023-12-21T15:10:14+5:30
'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.

साताजन्माच्या गाठी! मुग्धा-प्रथमेश अडकले लग्नाच्या बेडीत, विवाहसोहळ्यातील पहिला फोटो समोर
सध्या मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. एका मागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या लग्नाची लगबग सुरू होती. आज मुग्धा आणि प्रथमेश यांनी लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली. मित्रपरिवार, नातेवाईक आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात चिपळूणमध्ये मुग्धा-प्रथमेशचा विवाहसोहळा पार पडला.
'सा रे ग म प लिटिल चॅम्प' फेम मोदक आणि मॉनिटर म्हणजेच प्रथमेश आणि मुग्धाने काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्यांनी साखरपुडाही उरकला होता. हे कळताच त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. आता ही सुरेल जोडी कायमची लग्नबंधनात अडकली आहे. मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाला गायक रोहित राऊतनेी हजेरी लावली होती. रोहितने सोशल मीडियावर मुग्धा-प्रथमेशच्या लग्नातील गोड क्षणाचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुग्धा आणि प्रथमेशने त्यांच्या आयुष्यातील या खास क्षणासाठी पारंपरिक केला होता. मुग्धाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक केला होता. तर प्रथमेशही धोतरमध्ये राजबिंडा दिसत होता. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
प्रथमेश आणि मुग्धाची भेट अगदी लहान वयातच सारेगमप शोमध्ये झाली. दोघांच्याही गाण्याचा जॉनर एक असल्याने नंतर त्यांनी एकत्र शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम केले. तेव्हाच दोघांचे सूर जुळले. मुग्धा-प्रथमेशने रेशीमगाठ बांधल्याने चाहतेही आनंदी आहेत.