कुठे आहेत रामानंद सागर यांच्या मालिकेती श्रीकृष्ण? इंडस्ट्री सोडली, आता करतात असं काम, वाचून म्हणाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 02:23 PM2023-09-06T14:23:01+5:302023-09-06T14:24:38+5:30
Shri krishna TV serial: ९० च्या दशकात आलेल्या श्रीकृष्णा या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे स्वप्निल जोशी आणि सर्वदमन बॅनर्जी खूप लोकप्रिय झाले होते. पैकी युवा श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे स्वप्निल जोशी आज मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. तर मोठ्या श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे सर्वदमन बॅनर्जी (Sarvadaman D Banerjee) आज कुठे आहेत, हे अनेकांना ठावूक नाही.
प्रख्यात दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या दूरदर्शनवरील रामायण, श्रीकृष्णा आदी मालिका खूप लोकप्रिय झाल्या होत्या. त्यापैकी ९० च्या दशकात आलेल्या श्रीकृष्णा या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे स्वप्निल जोशी आणि सर्वदमन बॅनर्जी खूप लोकप्रिय झाले होते. पैकी युवा श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे स्वप्निल जोशी आज मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. तर मोठ्या श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे सर्वदमन बॅनर्जी आज कुठे आहेत, हे अनेकांना ठावूक नाही. श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे सर्वदमन बॅनर्जी हे एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सर्वदमन बॅनर्जी यांनी सांगितले होते की, मला टीव्ही मालिकांमध्ये कधीही काम करायचं नव्हतं. मी चित्रपटांमध्ये काम करत होतो. कारण चित्रपटातील एक शॉर्टसुद्धा १०० वर्षे टिकतो. त्यावेळी रामानंद सागर यांनी मला बोलावले. ते टीव्ही मालिकेसाठी बोलावताहेत हे मला माहिती होते. त्यामुळे मी जाऊ इच्छित नव्हतो. टीव्ही ही कला नाही, असं मला वाटायचं.
मी रामानंद सागर यांना भेटलो तेव्हा त्यांनी कागदांचा एक गठ्ठा माझ्या हातात ठेवला. हे माझे संवाद आहेत, असं त्यांनी सांगितलं. मी तिथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात ते तिथे आले. त्यानंतर जे काही घडलं ते सर्वांना माहिती आहे, असे सर्वदमन बॅनर्जी म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, ही मालिका सुमारे १० वर्षे चालली. ज्या प्रकारे तिची लोकप्रियता वाढली. त्यामुळे कुठलातरी बॉम्ब माझ्या खोलीत फुटला असं मला वाटायचं. मात्र आता या मालिकेची कल्ट शोमध्ये गणना होते. मात्र मी आजपर्यंत ही मालिका पाहिलेली नाही.
या मालिकेनंतर सर्वदमन बॅनर्जी यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र श्री कृष्णा मालिकेला जी लोकप्रियता मिळाली तशी लोकप्रियता मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी इंडस्ट्री सोडली आणि ते ऋषिकेश येथे गेले. मिळालेल्या माहितीनुसार ते ऋषिकेषमध्ये निशुल्क योग आणि मेडिटेशन क्लास चालवतात. त्याबरोबरच पंख नावाच्या एका संस्थेसोबत त्यांनी स्वत:ला जोडून घेतले आहे. ही संस्था गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काम करते.