आणखी एक मराठमोळी अभिनेत्री बांधणार लग्नगाठ, साखरपुड्याचे फोटो व्हायरल, म्हणाली-मी खूप भाग्यवान...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 11:43 AM2022-10-08T11:43:18+5:302022-10-08T13:14:26+5:30

साखरपुड्याचे फोटो तिने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंवर सेलिब्रेटींसह चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Sasural simar ka 2 fame Shubhangi Tambale got engaged | आणखी एक मराठमोळी अभिनेत्री बांधणार लग्नगाठ, साखरपुड्याचे फोटो व्हायरल, म्हणाली-मी खूप भाग्यवान...

आणखी एक मराठमोळी अभिनेत्री बांधणार लग्नगाठ, साखरपुड्याचे फोटो व्हायरल, म्हणाली-मी खूप भाग्यवान...

googlenewsNext

सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. बॉलिवूडपासून ते टेलिव्हिजनपर्यंत अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री हृता दुर्गुळे, अमृता पवार, रुपल नंदानंतर आणखी एक अभिनेत्री लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच तिचा साखरपुडा झाला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.  ससुराल सिमर का सीझन २ या मालिकेतून आणि बॉइज २ या सिनेमातून घराघरात पोहोचलेली शुभांगी तांबाळे हिनेही मित्र करण मेहताशी साखरपुडा केला आहे.  

ससुराल सिमर का ही हिंदी मालिका खूपच लोकप्रिय झाली. या मालिकेमुळे शुभांगी तांबाळे हे नाव घरोघरी पोहोचले.  ससुराल सिमर का या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये शुभांगीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ही तिची पहिलीच हिंदी मालिका होती, त्यापूर्वी शुभांगीने मराठी मालिका, नाटकात काम केलं होतं. बॉइज २ या सिनेमातही शुभांगीची खास भूमिका होती.

साखरपुड्याचे फोटो तिने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर शेअर केले. तिने हिरव्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. शुभांगीने फोटो शेअर करत असं लिहिलं आहे की, एक छान प्रेम कुटुंब माझं सासर असावं हे माझं स्वप्न होतं. त्या कुटुंबात वडीलधारी मंडळी असावीत आणि त्यांचं आर्शीवाद, मार्गदर्शन मिळावं. मी खूप भाग्यवान आहे की मला असं सासर मिळालं. जिथं परंपरा, संस्कार, प्रेम सगळंच आहे. शुभांगी या फोटोंवर सेलिब्रेटींसह चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Web Title: Sasural simar ka 2 fame Shubhangi Tambale got engaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.