गोपी बहूच्या घरी येणार नवा पाहुणा! देवोलिना भट्टाचार्जीने दिली गुडन्यूज, ३८व्या वर्षी होणार आई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 09:58 AM2024-08-16T09:58:50+5:302024-08-16T09:59:40+5:30
Devoleena Bhatacharjee Pregnant : देवोलिनाने एक गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. देवोलिना सोशल मीडियावरुन गरोदर असल्याची घोषणा केली आहे. लवकरच देवोलिना आई होणार असून तिच्या घरी पाळणा हलणार आहे.
'साथ निभाना साथिया' या मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारून अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी घराघरात पोहोचली. देवोलिनाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट्स देत असते. नुकतंच देवोलिनाने एक गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. देवोलिना सोशल मीडियावरुन गरोदर असल्याची घोषणा केली आहे. लवकरच देवोलिना आई होणार असून तिच्या घरी पाळणा हलणार आहे.
देवोलिनाने इन्स्टाग्रामवरुन पोस्ट शेअर करत आई होणार असल्याचं सांगितलं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून देवोलिना गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, त्याबाबत देवोलिनाने काहीच भाष्य केलं नव्हतं. त्यामुळे चाहतेही संभ्रमात होते. अखेर देवोलिनाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं सांगितलं आहे. देवोलिनाने पती आणि कुटुंबीयांबरोबरचे काही फोटो शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे. आई होण्यासाठी उत्सुक असल्याचं देवोलिनाने म्हटलं आहे. देवोलिनाच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
देवोलिनाने २०२२ साली शाहनवाज शेखसोबत लग्नगाठ बांधली होती. आंतरधर्मीय विवाह केल्याने देवोलिनाला ट्रोलही करण्यात आलं होतं. देवोलिनाचा पती शाहनवाज हा एक जीम ट्रेनर आहे. लग्नानंतर आता दोन वर्षांनी देवोलिना आणि शाहनवाज आईबाबा होणार आहे. नव्या पाहुण्याची चाहुल लागल्याने त्यांचे कुटुंबीयही आनंदी आहेत.