सतीश कौशिक का म्हणतायेत मे आय कम इन,मॅडम?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2017 04:43 PM2017-01-10T16:43:48+5:302017-01-10T17:15:30+5:30
'मे आय कम इन, मॅडम?’ म्हणत दिग्दर्शक-अभिनेते सतीश कौशिक छोट्या पडद्यावर एंट्री करणार आहेत.‘मिस्टर इंडिया’ आणि ‘दीवाना मस्ताना’ यासह ...
' ;मे आय कम इन, मॅडम?’ म्हणत दिग्दर्शक-अभिनेते सतीश कौशिक छोट्या पडद्यावर एंट्री करणार आहेत.‘मिस्टर इंडिया’ आणि ‘दीवाना मस्ताना’ यासह अनेक सिनेमा तसेच नाटक आणि टीव्ही मालिकांमध्येही आपल्या भूमिेकेने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले आहे.आता तब्बल वर्षभरानंतर ते पुन्हा एकदा टीव्ही मालिकेमध्ये झळकणार आहेत. मे आय कम इन,मॅडम?’या कॉमेडी मालिकेत ते पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या मालिकेत ते साजनच्या (संदीप आनंद) काकांच्या भूमिकेत ते दिसणार आहेत. ते स्वत: शिकलेले असून त्यांना आपला पुतण्या साजनच्या पत्नीने निदान ‘एमबीए’सारखी उच्च पदवी संपादन केलेली हवी असते. परंतु साजनची पत्नी काश्मिरा ही फारशी शिकलेली नसते. आपले काका जेमतेम तासाभरापुरते आपल्या घरी येणार असल्याचे लक्षात येताच साजन आपली बॉस संजना (नेहा पेंडसे) हिला थोड्य़ा वेळासाठी आपली ‘एमबीए’ पत्नी बनण्याची विनंती करतो आणि पत्नी काश्मिराला घरकाम करणा-या बाईची भूमिका करायला सांगतो.
टीव्ही मालिकांमधील आपल्या कमबॅकबद्दल सतीश कौशिक म्हणाले, “टीव्ही मालिकांमध्ये काम करणं ही धमाल असते. त्यात माझा अभिनेता म्हणून कस लागत असल्याने मला मालिकांमध्ये भूमिका साकारायला फार आवडतात. आता मला ‘मे आय कम इन, मॅडम?’ या विनोदी मालिकेत भूमिका साकारण्याची संधी मिळत असल्याबद्दल मी फार खुश आहे, कारण ही माझी स्वत:ची अतिशय आवडती मालिका आहे. त्यात मला एक छोटी भूमिका करायला मिळतेय.त्याचा मला आनंद वाटतोय. शिवाय या मालिकेतील सगळेच कलाकार मला खूप आवडतात. मी त्यांचा फॅन आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबरही मला स्क्रीन शेअर करायला मिळतेय. या कलाकारांकडून मला खूप काही शिकायला मिळणार असल्याचेही यावेळी सतीश कौशिक यांनी सांगितले.