सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका उत्कंठावर्धक वळणावर, त्रिनयना देवीच्या रहस्याचं गूढ आणखी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 15:07 IST2023-09-26T15:04:16+5:302023-09-26T15:07:52+5:30
त्रिनयना देवी आजोबांच्या बाबतीत नेमकं काय रहस्य आहे, हा महत्वपूर्ण टप्पा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका उत्कंठावर्धक वळणावर, त्रिनयना देवीच्या रहस्याचं गूढ आणखी वाढणार
आजोबांना शिक्षा होणार, मनोरमाने दिलेल्या शापामुळे त्यांचा मृत्यू अटळ आहे, परंतु हे सगळं घडणार कसं, त्रिनयना देवी नेत्राला या संबंधित घटनांचे संकेत देऊन काय सांगू पाहतेय, हे सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत पहायला मिळणार आहे. ३० सप्टेंबरला त्रिनयना देवी आजोबांच्या बाबतीत नेमकं काय रहस्य आहे, हा महत्वपूर्ण टप्पा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
नेत्रा इंद्राणीची खरी बाजू कळल्यापासून इंद्राणीला नात्यांचा ओलावा देऊन तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. इंद्राणीलाही नेत्राबद्दल आपलेपणा वाटू लागला आहे. अशातच रूपाली मात्र नेत्रावर आजोबांच्या मृत्यूचा आळ येण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच ही महत्त्वपूर्ण घटना घडणार असून आजोबा अचानक गायब होऊन वावोशीला जाणार आहेत. आजोबा वावोशीला कसे जाणार, नेत्रा आजोबांना वाचवू शकेल का, त्रिनयना देवी यावेळी नेत्रा आणि इंद्राणी या दोघींचीही परीक्षा घेणार का हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका आपल्या झी मराठी वाहिनीवर.
मालिकेच्या गोष्टीत लवकरच महत्त्वपूर्ण बदल होणार असून नेत्राचा संघर्ष अधिक प्रभावी होणार आहे. त्याचबरोबर अव्दैतच्या व्यक्तिरेखेविषयी प्रेक्षकांना वाटणारी आपुलकी लक्षात घेऊन अव्दैतच्या व्यक्तिरेखेतही नवा ट्विस्ट येणार आहे.