'सातव्या मुलीची सातवी मुलगी'फेम 'ही' अभिनेत्री आहे बाईक रायडर; रोड ट्रिपची आहे तिला आवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 16:10 IST2024-01-29T16:09:37+5:302024-01-29T16:10:09+5:30
Shweta mehendale: ती तिच्या रोड ट्रीपमधील फोटो, व्हिडीओ नेटकऱ्यांसोबत शेअर सुद्धा करते.

'सातव्या मुलीची सातवी मुलगी'फेम 'ही' अभिनेत्री आहे बाईक रायडर; रोड ट्रिपची आहे तिला आवड
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'सातव्या मुलीची सातवी मुलगी'. ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. यामध्येच आता या मालिकेत अनेक उत्कंठावर्धक वळणं येताना दिसत आहेत. त्यामुळे या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसते. विशेष म्हणजे या मालिकेतील कलाकारही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असून त्यातील एका अभिनेत्रीची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीला अभिनयासोबत बाईक रायडिंग करायचीही विशेष आवड आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती बाईक घेऊन नवनवीन ठिकाणांना भेट देते. विशेष म्हणजे ती तिच्या या रोड ट्रीपमधील फोटो, व्हिडीओ नेटकऱ्यांसोबत शेअर सुद्धा करते.
अभिनयासोबत बाईक चालवायची आवड असणारी ही अभिनेत्री म्हणजे श्वेता मेहंदळे (shweta mehendale). श्वेता उत्तम बाईक रायडर असून तिला बुलेट चालवायला विशेष आवडतं. अलिकडेच तिने हिवाळ्याच्या दिवसात बाईक चालवण्याचा अनुभव सांगितला. हिवाळ्यात तिला खासकरुन कोकणात बाईक चालवायला आवडते असं ती म्हणाली.
"माझा जन्म मुंबईचा असल्यामुळे माझ्याकडे काहीकाळ स्वेटरच नव्हते. गेल्यावर्षी जेव्हा कोकण राइड केली तेव्हा कळलं की पहाटे कोकणात बाइक राइडमध्ये थंडी लागते. पण मग जेव्हा मी गोव्याची राइड केली तेव्हा पहिल्यांदा थर्मल, हात मोजे घेतले. मला मुळात थंडी तशी कमी वाजते. पण थंडीमध्ये कोकणात फिरायला तेही पहाटे बाइक वरून खूप प्रसन्न वाटतं. मोकळे रस्ते, थंडगार वारा त्यासोबत मी आणि माझी बाइक, वाट पाहते आहे मी सुट्टीची परत हे सगळं अनुभवायला, असं श्वेता म्हणाली.