'सावळ्याची जणू सावली' मालिकेत ही लोकप्रिय अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार, बघा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 09:56 AM2024-08-10T09:56:03+5:302024-08-10T09:56:30+5:30

झी मराठीवरील आगामी सावळ्याची जणू सावली मालिकेत ही लोकप्रिय अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका

savlyachi janu savali serial zee marathi actress prapti redkar in lead role | 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत ही लोकप्रिय अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार, बघा प्रोमो

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत ही लोकप्रिय अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार, बघा प्रोमो

झी मराठीवरील आगामी मालिकेची सर्वांना उत्सुकता आहे. ही मालिका म्हणजे 'सावळ्याची जणू सावली'. आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर 'सावळ्याची जणू सावली' मालिकेची घोषणा करण्यात आली.  या मालिकेत प्रमुख भूमिका कोण साकारणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर काल झी मराठीने मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणलाय. या प्रोमोत प्रमुख भूमिका कोण साकारणार याचा उलगडा झाला आहे.

ही अभिनेत्री झळकणार 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत

'सावळ्याची जणू सावली' मालिकेचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत या मालिकेत प्रमुख भूमिका कोण साकारणार याचा उलगडा झालीय. ही अभिनेत्री म्हणजे प्राप्ती रेडकर. केसात गजरा, डोळ्यांवर चष्मा लावणारी प्राप्ती डुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसते. ती विठ्ठलाच्या मुर्तीवर पाण्याने अभिषेक करुन फुलं वाहते. प्राप्ती या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार हे उघड झालंय. प्राप्तीला आपण याआधी काव्यांजली मालिकेत अभिनय करताना पाहिलंय. अनेकांनी प्राप्तीला नवीन मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


काय असणार मालिकेची कथा

या मालिकेचा प्रोमो रिलीज होताच अनेकांनी कमेंटमध्ये ही मालिका झी बांगलावरील एका बंगाली मालिकेचा रिमेक असल्याचं सांगितलं आहे. 'कृष्णकोली' असं मूळ बंगाली मालिकेचं नाव आहे. या मालिकेची कथा अशी होती की, एक मुलगी कृष्णाची भक्त आहे. ती दिसायला सावळी आहे. कृष्णाचा रंगही सावळा असल्याने ती तिच्या रंगाचा स्वीकार करते. या मुलीची मोठी स्वप्न असतात. परंतु तरीही रंगावरुन तिला समाजाचा सामना करावा लागतो. असं कथानक या मालिकेचं आहे. झी मराठीवर सुरु होणाऱ्या 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत प्राप्तीशिवाय आणखी कोणते कलाकार दिसणार, मालिका कधीपासून सुरु होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

 

Web Title: savlyachi janu savali serial zee marathi actress prapti redkar in lead role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.