मालिकेतल्या दृष्यावर रसिकांची नाराजी, ही तर विकृती म्हणत व्यक्त करतायेत संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 04:30 PM2021-08-06T16:30:20+5:302021-08-06T16:42:40+5:30
'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेने सुरुवातीपासूनच रसिकांची पसंती मिळवली. मालिकेतल्या कलाकारांचा दमदार अभिनय आणि मालिकेचे कथानकामुळे रसिकही खिळून ...
'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेने सुरुवातीपासूनच रसिकांची पसंती मिळवली. मालिकेतल्या कलाकारांचा दमदार अभिनय आणि मालिकेचे कथानकामुळे रसिकही खिळून होते. पण मालिका जशी रसिकांची पसंती मिळवत होती तशी दुसरीकडे रसिकांच्या नाराजीलाही सामोरे जावे लागत होते. अनेकदा मनोरंजनाच्या नावाखाली नको त्या गोष्टी दाखवल्याने चाहत्यांचाही संताप होतो. मालिकेला सोशल मीडियावर ट्रोलही केले जाते. सध्या 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेच्या एका सीनवर चाहत्यांचा संताप होतोय.
रसिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नको त्या गोष्टी दाखवत त्याचे प्रमोशन केले जात असल्याचे म्हणत चाहत्यांनी या मालिकेवर टीका केली आहे. मालिकेच्या कथानकात चिन्याचा ट्रेनमधून पडल्याने अपघात होत असे दाखवण्यात आले होते. हे दृष्य पाहताच रसिकांचा चांगलाच संताप झाला. कटकारस्थानं करणारा मोहित चिन्याचा अपघात घडवून आणण्यासाठी त्याच्या हातातल्या सेप्टीपिनने चिन्याला टोचतो. चिन्याहा ट्रेनमध्ये दरवाजातच उभा असतो आणि चिन्याचा हात निसटल्याने तो पडतो असे दृष्य दाखवण्यात आले होते.
या दृष्यामुळे सध्या मालिकेला रसिकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. नेहमीच गरिबांची थट्टा , त्यांच्या विरोधात नेहमी कटकारस्थानं दाखवणं ही एक विकृती असल्याचं मत रसिकप्रेक्षक व्यक्त करताना दिसत आहे. यापूर्वीही एका दृष्यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मालविका साळवींचं घर स्वत:च्या नावावर करुन घेते असे दाखवण्यात आले होते.इतकंच नाही तर घर खाली करण्यासाठी काही गुंडांना पाठवते.
गुंड ज्या प्रकारे साळवी कुटुंबाला घराबाहेर काढतात ते पाहूनही रसिकांनी अक्षरक्षः मालिका बंद करण्याच सुचवले होते. नको त्या गोष्टी दाखवून, गरिबांची अशा प्रकारे थट्टाच उडवली जात असल्याच्या टीकाही झाल्या होत्या. यापेक्षाही चांगल्या गोष्टी दाखवून मालिका रंजक करता येते. पण मालिकेचे हे आता नेहमीचे कथानक झाले आहे असे युजर्स कमेंट करताना दिसले होते.