प्रेम या पहेली चंद्रकांतामधील गौरव खन्ना आणि क्रितिका कार्मा यांची सिझलिंग केमिस्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2017 12:16 PM2017-03-10T12:16:44+5:302017-03-10T17:46:44+5:30
चंद्रकांता ही मालिका नव्वदीच्या दशकात खूप गाजली होती. आज अनेक वर्षं झाली तरी या मालिकेतील व्यक्तिरेखा, कलाकार आजही प्रेक्षकांच्या ...
च द्रकांता ही मालिका नव्वदीच्या दशकात खूप गाजली होती. आज अनेक वर्षं झाली तरी या मालिकेतील व्यक्तिरेखा, कलाकार आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या मालिकेवर आधारित प्रेम या पहेली चंद्रकांता ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या कार्यक्रमात क्रितिका कार्मा, गौरव खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचप्रकारे पुनित वशिष्ठ आणि हर्ष वशिष्ठ हे दोन भाऊदेखील या मालिकेत प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. ही मालिका सुरू होऊन केवळ काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
या मालिकेत गौरव खन्ना राजपुत्र विरेंद्र सिंग तर क्रितिका कार्मा चंद्रकांता ही भूमिका साकारत आहे. मालिकेतील क्रितिका आणि गौरवची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीबद्दल गौरव सांगतो, "क्रितिका ही खूप चांगली अभिनेत्री असल्यामुळेच आमच्या दोघांची केमिस्ट्री खूप चांगली जुळून आली आहे. सहकलाकार म्हणून तुम्ही एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेतले तर तुमचे परफॉर्मन्स अधिक चांगले होतात असे मला वाटते. मी साकारत असलेली भूमिका ही अतिशय कणखर आहे. क्रितिकामुळे माझी भूमिका अधिक खुलून येत आहे असे मला वाटते. तिच्यामुळेच मला काम करणे अधिक सोपे जात आहे. खऱ्या आयुष्यातही आम्ही दोघांची खूप चांगली मैत्री आहे आणि त्यामुळे हीच केमिस्ट्री प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळत आहे. आमची केमिस्ट्री आवडत असल्याचे अनेक संदेश आम्हाला लोक पाठवत असून यासाठी मी त्यांचा आभारी आहे."