हे आहे सिद्धार्थ जाधव आणि तृप्तीच्या नात्याचे गुपित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2017 11:52 AM2017-03-17T11:52:57+5:302017-03-17T17:23:43+5:30
तुला नच बलिया सीझन 8मध्ये एंट्री घेताना कसे वाटते आहे तुला ? खूप एक्सायटेड आहे मी याआधीही मला नचसाठी ...
खूप एक्सायटेड आहे मी याआधीही मला नचसाठी मला ऑफर आली होती मात्र त्यावेळी तारखेने मुळे ते शक्य झाले नव्हते. याही वेळी माझ एका चित्रपटाचे शूटिंग होणार होत अमेरिकेत मात्र ते रद्द झाल्यामुळे मी या पर्वात सहभागी होतो आहे. या शोमध्ये सहभागी होण्यामागचे मुख्य कारण तृप्ती होते. माझ्या बलियेसाठी मी या शोमध्ये सहभागी झालो आहे खूप एऩ्जॉय करतोय सगळ्या गोष्टी. नचच्या निमित्ताने मला तृप्तीबरोबर वेळ घालवायला मिळतो आहे.
याआधीचे दोन मराठमोळ्या जोड्या हे पर्व जिंकल्या आहेत त्याबद्दल काय सांगशील ?
दडपण अजिबात नाही आहे. आधीच्या जोड्या फारच ग्रेट होत्या आम्ही ही आमच्या पद्धतीने हे पर्व जिंकण्यासाठी महेनत नक्की करणार आहे. मात्र त्यापेक्षाही आम्ही हा प्रवास एकमेकांची कंपनी जास्त एन्जॉय करतोय.
तू टीव्ही आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात काम केले आहेस त्यामुळे तुला काय फरक जाणवतो ?
मी सुरुवातीच्या काळात टीव्हीवर काम केले. त्यानतंर मात्र मी चित्रपट आणि नाटकांमध्ये जास्त रमलो. मात्र एखादा अँकर बेस शो मला करायला नक्कीच आवडले. ज्यात प्रेक्षक मला सिद्धार्थ जाधव म्हणून बघू शकतील .
तुझ्या आगामी प्रोजेक्ट विषयी काय सांगशील ?
माझ्या माणूस एक माती नावाचा चित्रपट येतोय. यात बाप-लेकाच्या नात्यावर भाष्य करण्यात आले आहे. आणि गेला उडत हे नाटकचे माझे प्रयोग चालूच आहे आणि आता सध्या नचमध्ये बिझी आहे.
सिद्धार्थ जाधवचा ड्रीम रोल कोणता ?
मला कधीच वाटले नव्हते मी आयुष्यात कधी हिरो बनेन. त्यामुळे ड्रीम रोल असे माझा कोणताच नाही प्रत्येक रोल हा माझ्यासाठी ड्रीम रोलच होता. जत्रामधला सिद्ध असो इरादा पक्कामधला रोहित किंवा हुप्पा हुय्यामधला हणम्या असो हा प्रत्येक रोल माझ्यासाठी ड्रीम रोलच होता.
लवकरच तुमच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण होतायेत.याप्रवासाबद्दल काय सांगशील ?
हा प्रवास खूपच सुंदर होता. तृप्तीमुळे मी आज इथ पर्यंत पोहोचू शकले. तिने नेहमीच माझ घर संभाळले. माझ्या यशात सगळ्यात महत्त्वाचा वाटा तिचा आहे. तिच्या सपोर्ट शिवाय इथेपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. नचच्या आम्ही आमचा 10 वर्षांचा प्रवास पुन्हा जगतो आहे.
तृप्तीबरोबर तु पहिल्यांदा ऑनस्क्रीन येते आहेस याबद्दल किती एक्सायटेड आहेस ?
मी खूप जास्त एक्सायटेड आहे. 6-6 तास आम्ही डान्सच्या रियल्स करतो आहे. मी कथक शिकले आहे आणि कॉलेजमध्ये असताना एक्टींग ही केली आहे. मात्र कॉलेजनंतर काही केले नाही. नच मुळे मला ती संधी पुन्हा एकदा मिळाली आहे. मीच सिद्धूच्या या शोमध्ये सहभागी होण्यासाठी मागे लागले होते. माझी खूप इच्छा होती मी आणि सिद्धने या शोमध्ये परफॉर्म करावे. यानंतरही एखादी संधी मिळाली
तुझे आणि सिद्धूच लव्ह मॅरेज आहे त्यावेळी तुमच्या लग्नाला विरोध झाला होता घरातून ?
हो, माझे कुटुंब यानात्यासाठी तयार नव्हते. घरच्यांचा विरोधात जाऊन आम्ही लग्न केले होतो. त्यावेळी तो स्ट्रगलिंग अॅक्टर होता आणि मी एका चांगल्या ठिकाणी नोकरीला होते. त्यामुळे घरातून विरोध होणे हे कधीच स्वभाविक होते मात्र माझा सिद्धार्थवर पूर्णपणे विश्वास होता. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी येऊन माझ्या आई-वडिलांनी आमच्या नात्याला स्वीकारले आणि त्यांना सिद्धार्थचा जावयी म्हणून खूप अभिमान आहे.