तुझसे है राबता या मालिकेसाठी सेहबान अझिम घेतोय अशी मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 03:12 PM2018-09-17T15:12:22+5:302018-09-18T08:30:00+5:30
तुझसे है राबता ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेच्या वेगळ्या कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपलाशा वाटत आहेत. या मालिकेत नुकतीच सेहबान अझिमची एंट्री झाली आहे.
झी टीव्हीवर प्रेक्षकांना तुझसे है राबता ही मालिका पाहायला मिळत असून या मालिकेत आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करण्यात आले आहे. या मालिकेत आंबटगोड अशी आईमुलीच्या नात्याची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. दोन स्त्रिया अनुप्रिया (पूर्वा गोखले) आणि कल्याणी (रीम शेख) या रक्ताच्या नात्याने जोडल्या नसल्या तरी त्यांच्यात वेगळाच असा एक स्नेहबंध निर्माण होतो अशी या मालिकेची कथा आहे.
तुझसे है राबता ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेच्या वेगळ्या कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपलाशा वाटत आहेत. या मालिकेत नुकतीच सेहबान अझिमची एंट्री झाली आहे. या मालिकेत तो प्रेक्षकांना इन्स्पेक्टर मल्हार राणेच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत आता मल्हारच्या येण्याने मोठे नाट्य घडणार असून प्रेक्षकांना काही जबरदस्त अॅक्शन दृश्येसुद्धा पाहायला मिळणार आहेत. सेहबान या मालिकेत एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून त्याचे व्यक्तिमत्त्व लाघवी आहे आणि तो अनुप्रियाच्या अतिशय विश्वासातील आहे असे दाखवण्यात येणार आहे. मालिकेतील व्यक्तिरेखेसाठी आणि लूकसाठी सेहबान सध्या चांगलीच मेहनत घेत आहे. या मालिकेसाठी त्याने आपले थोडे वजन देखील वाढवले आहे. तो सध्या रोज जिममध्ये मेहनत घेत असून त्याचे पाच किलो वजन देखील वाढले आहे. आपला हा अनुभव सांगताना सेहबान सांगतो, “मला वाटतं तुमच्या व्यक्तिरेखेप्रमाणे तुम्ही दिसणे आणि वाटणे महत्त्वाचे आहे. मी या मालिकेमध्ये एसीपी असल्यामुळे मला माझ्या शरीरयष्टीवर नीट काम करायचे होते. त्यामुळे मी रोज व्यायाम करत आहे आणि माझ्या छाती, दंडांवर विशेष लक्ष देत आहे. मी साधारण डाएट आणि भरपूर व्यायाम करत असून त्यामुळे मला योग्य तो लूक मिळेल अशी मला आशा आहे. प्रेक्षकांना मला मल्हार राणेच्या रूपात पाहायला नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे.
तुझसे है राबता ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता झी टीव्हीवर पाहायला मिळत आहे.