'सावली होईन सुखाची' मालिकेतली गौरी उर्फ सीमा कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 17:34 IST2023-09-13T17:33:44+5:302023-09-13T17:34:07+5:30
Seema Kulkarni : सीमा कुलकर्णी सावली होईन सुखाची या मालिकेत मोलकरणीची भूमिका साकारते आहे.

'सावली होईन सुखाची' मालिकेतली गौरी उर्फ सीमा कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज
सीमा कुलकर्णी ही बॉलिवूड आणि मराठी चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल,थिएटर आर्टिस्ट आसून तिने अनेक फीचर फिल्म्स, टेलिव्हिजन मालिका आणि नाटकांमध्ये काम केलीली आहेत.तसेच सध्या ती सन मराठीवरील सावली होईन सुखाची या मालिकेत प्रमुख भूमिका गौरी साकारत आहे. सीमा कुलकर्णी मालिकेत मोलकरणीची भूमिका साकारते आहे. मात्र खऱ्या आयुष्यात ती खूपच ग्लॅमरस आहे.
ही गोष्ट आहे श्रीमंत कुटुंबाची, कुटुंब आर्थिकदृष्ट्या कितीही परिपूर्ण असलं तरी घरातील सदस्यांना एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी, माया काही वाटत नाही. जणू त्या घराने कधी प्रेम हे पाहिलंच नसावं. तसेच त्या श्रीमंत घराण्यातील एक सदस्य जो भूतकाळातील एका घटनेमुळे वाईट सवयींच्या आहारी गेला आहे, त्याच्यामुळे घरात सकारात्मक असं वातावरण नाही. पण त्याच घरात एक मोलकरीण आणि एक अनाथ मुलगी यांचा प्रेमळ स्वभाव देखील वावरतोय.
कदाचित त्या दोघींच्या मनमिळावू स्वभावामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. नुकतीच या मालिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि प्रोमोमध्ये मालिकेचा नायक रोनक शिंदे ज्याला वाईट सवयी लागल्या आहेत आणि घरातील सर्वजण त्याच्या विरोधात आहेत आणि मालिकेची नायिका सीमा कुलकर्णी जी मोलकरणीच्या भूमिकेत दिसली आहे, त्यांच्यातील अबोल भावना पाहायला मिळाल्या. एखाद्यावर ठरवून प्रेम केलं जात नाही, ते आपसूक होतं, असंच काहीसं त्यांचं नातं आहे. त्या दोघांना एकमेकांची सोबत मिळेल का, हे लवकरच कळेल.
रोनक शिंदे, सीमा कुलकर्णी यांच्यासह आरंभी उबाळे, रुतविज कुलकर्णी, धनंजय वाबळे, सुप्रिया विनोद, एकनाथ गिते, नैना सामंत, यश पेडणेकर, ज्ञानेश्वरी देशपांडे, अवनिश आस्तेकर, श्वेता मांडे, निशा कथावते, निलेश गावरे, पूनम चव्हाण, सलमान तांबोळी आणि आशिष चौधरी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. रतिश तगडे, पदमनाभ राणे आणि महेश बेंडे निर्मित, निशांत सुर्वे दिग्दर्शित ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेची कथा-पटकथा महाबळेश्वर नार्वेकर यांनी लिहिले असून विशाल कदम यांनी संवाद लिहिले आहेत.