‘जय कन्हैय्या लाल की’ मालिकेच्या वेळी या मालिकेचे होणार प्रसारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 07:06 AM2018-05-14T07:06:37+5:302018-05-14T12:36:37+5:30

‘जय कन्हैय्या लाल की’ ही मालिका म्हणजे विशाल वशिष्ठ आणि श्वेता भट्टाचार्य यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘भोजो गोबिंदो’ या ...

The series will be broadcast in the series 'Jai Kanhaiya Lal Ki'! | ‘जय कन्हैय्या लाल की’ मालिकेच्या वेळी या मालिकेचे होणार प्रसारण!

‘जय कन्हैय्या लाल की’ मालिकेच्या वेळी या मालिकेचे होणार प्रसारण!

googlenewsNext
य कन्हैय्या लाल की’ ही मालिका म्हणजे विशाल वशिष्ठ आणि श्वेता भट्टाचार्य यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘भोजो गोबिंदो’ या बंगाली मालिकेचे हिंदी रुपांतर आहे. या मालिकेची घोषणा झाल्यावर तिने प्रेक्षकांमध्ये खळबळ माजविली होती.मात्र ताज्या घडामोडींनुसार ही मालिका आता बंद होणार आहे. ‘स्टार भारत’ वाहिनी लवकरच ‘मुस्कान’ नावाची नवी मालिका प्रसारित करणार आहे. आता ‘जय कन्हैय्या लाल की’च्या जागी सोमवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता ‘मुस्कान’चे प्रसारण केले जाईल.मुस्कान ही एक हृदयस्पर्शी कथा असून तिच्या प्रोमोंना प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे.या प्रोमोंमुळे मालिकेच्या कथानकाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून या सात वर्षांच्या मुस्कान नावाच्या मुलीची काय कथा असेल, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. मुस्कानचे बालपण हे लपंडाव का आहे आणि तिची आई आरती तिला कायम चार भिंतींआड का कोंडून ठेवते, याविषयी फारच उत्सुकता निर्माण झाली आहे.येत्या 29 मेपासून या मालिकेचे प्रसारण सुरू होईल.सोनाक्षी सावे या बालकलाकाराने ‘मुस्कान’ची भूमिका रंगविली असून अरिना डे या बंगाली अभिनेत्रीने तिची आई आरती हिची भूमिका साकारली आहे.लविना टंडन आणि रिचा सोनी या टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीही या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारतील.


मुळात 'जय कन्हैय्यालाल की' ही मालिका लोकप्रिय बंगाली टिव्ही मालिका 'भोजो गोबिंदोचा' रिमेक आहे.या मालिकेच्या माध्यमातून स्वेता भट्टाचार्यने टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण केले आहे. जेव्हा निर्मात्यांनी मला मालिकेची संकल्पना सांगितली तेव्हा नाही बोलण्याचा प्रश्नच नव्हता कारण,मालिकेची कथा खूपच इंटरेस्टींग वाटले.ही संधी स्विकारली.ही मालिका जानकी नाथ चौधरी,दाली आणि कन्हैय्या या तीन व्यक्तिरेखाभोवती फिरते.एक श्रीमंत आजोबा जानकी नाथ चौधरी आणि त्यांची अतिशय लाडावलेली नात दालीची कथा मालिकेत दाखवण्यात आली आहे.ही मालिका हलके फुलके कौटुंबिक नाट्‌यावर आधारित असून 'जय कन्हैय्या लाल की' ही मालिका रसिकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाली आहे.

Web Title: The series will be broadcast in the series 'Jai Kanhaiya Lal Ki'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.