चक्क 'चंद्र नंदिनी' च्या सेटवर या कलाकरांनी तयार केलाय बगीचा?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2016 01:47 PM2016-12-19T13:47:20+5:302016-12-19T13:48:42+5:30
'चंद्र नंदिनी' मालिकेतील नंदिनी म्हणजेच श्वेता बासूला अभिनयाव्यरिक्त आणखी एका गोष्टीची खूप आवड आहे ती म्हणजे मोकळी जागा दिसली ...
' ;चंद्र नंदिनी' मालिकेतील नंदिनी म्हणजेच श्वेता बासूला अभिनयाव्यरिक्त आणखी एका गोष्टीची खूप आवड आहे ती म्हणजे मोकळी जागा दिसली की तिथे रोपटं लावायची. नायगांवमध्ये यांच्या मालिकेचा सेट आहे. तिथे आजुबाजुला खूप मोकळी जागा आहे.तिने स्वतःपुढाकार घेऊन छोटी छोटी रोपटं आणली आणि तिथे ते रूजवायला सुरूवात केली. सेटच्या बाहेरच नव्हे तर तिने तिच्या मेकअप रूममध्येही मनीप्लांट, तुळस यासारखी रोपटे लावली आहेत. शूटिंगमधून मिळालेल्या फावल्या वेळेत श्वेता या झाडांची विशेष काळजी घेते. झाडांना पाणी घालण्यापासून ते या रोपट्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळतोय की नाही अशा प्रकारे योग्य काळजी घेते. नुसते झाडे लावून वा-यावर सोडून देण्यात काय अर्थ आहे. झाले लावा झाडे जगवा हा संदेश आपण सगळीकडे वाचत असतो मात्र यावर किती लोक यासाठी पुढाकार घेतात हा खरा प्रश्न आहे. झाडे लावा आणि योग्य काळजी घेत त्यांना जगवा असा सल्लाही श्वेता सा-यांना देतेय. या उपक्रमात इतर सहकलाकराही श्वेताला मदत करतात. म्हणजे श्वेता सेटवर नसते तेव्हा बाकी कलाकार स्वतः झाडांची काळजी घेतात. सेवटवर आता या कलाकरांमुळे एक चांगली बाग तयार झाल्याचे पाहायला मिळतात. नुसते सेटवरच नाही तर या कलाकरांनी आपापल्या घरी टेरेस किंवा बाल्कनीतसुद्धा वेगवेगळ्या प्रकाराची रोपं लावली आहेत. त्यातं कडीपत्ता, तुळस यांचा समावेश आहे. या रोपट्यांना पाहून एक वेगळा आनंद मिळतो. त्यांच्याशी एक वेगेळे नात निर्माण होते. विशेष म्हणजे रजत टोकस तर या झाडांशी गप्पाही मारत असल्याचे इतर कलाकार सांगतात.