​शब्बीर आहुवालियाचा भाऊ समीर आहुवालिया करणार नागिन फेम शारिका रैनाशी लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2017 10:59 AM2017-02-10T10:59:11+5:302017-02-10T16:29:11+5:30

शब्बीर आहुवालिया हे आज छोट्या पडद्यावरचे एक मोठे नाव आहे. त्याने आतापर्यंत अनेक हिट मालिका दिल्या आहेत. सध्या तो ...

Shabbir Ahuwaliya's brother Sameer Ahuwalia is married to Nagin Fame Sharaika Raina | ​शब्बीर आहुवालियाचा भाऊ समीर आहुवालिया करणार नागिन फेम शारिका रैनाशी लग्न

​शब्बीर आहुवालियाचा भाऊ समीर आहुवालिया करणार नागिन फेम शारिका रैनाशी लग्न

googlenewsNext
्बीर आहुवालिया हे आज छोट्या पडद्यावरचे एक मोठे नाव आहे. त्याने आतापर्यंत अनेक हिट मालिका दिल्या आहेत. सध्या तो कुमकुम भाग्य या मालिकेत झळकत आहे. शब्बीरला एक भाऊ असून तोदेखील इंडस्ट्रीत असल्याचे खूपच कमी जणांना माहीत आहे.
शब्बीर हा एक अभिनेता असला तरी त्याचा भाऊ हा कॅमेऱ्याचे मागे राहाणे पसंत करतो. त्याने अनेक कार्यक्रमात कॅमेऱ्याच्या मागे काम केले आहे. शब्बीरचा भाऊ समीर आणि नागिन या कार्यक्रमामुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री शारिका रैना हे लवकरच लग्न करणार आहेत. ते दोघे एका मालिकेच्या सेटवर भेटले होते आणि तिथून त्यांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली. या दोघांच्या प्रेमकथेविषयी शारिका सांगते, "एका मालिकेचे चित्रीकरण राजस्थानमध्ये करत असताना माझी समीरशी ओळख झाली. तो त्या मालिकेच्या प्रोडक्शन कंपनीत सुपरव्हायझर प्रोड्युसर म्हणून काम करत होता. त्याच्या कामाची पद्धत पाहून मी त्याच्या प्रेमात पडली. तो त्याच्या कामाच्या बाबतीत खूप पॅशिनेट आहे. त्याची हीच गोष्ट मला आवडली. एके दिवशी मालिकेचे चित्रीकरण संपायला खूपच वेळ झाला होता. त्यावेळी सेटवरच्या ज्या व्यक्तिंकडे स्वतःच्या गाड्या नव्हत्या, त्यांची जाण्याची व्यवस्था त्याने स्वतः करून दिली होती. लोकांना मदत करण्याचा त्याचा हा स्वभाव मला खूप आवडला. यामुळे आमच्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर माझ्या वडिलांच्या वाढदिवसाला मी त्याला माझ्या कुटुंबीयांना भेटवले आणि समीरला भेटून माझ्या घरातील सगळेच खूश झाले. माझ्या घरातल्यांनी माझ्या पसंतीला होकार दिला. मी समीरला प्रपोज तर खूपच छान स्टाइलमध्ये केले आहे. त्याच्या वाढदिवसाला मी त्याला एका कॉफी शॉपमध्ये घेऊन गेले आणि तिथे गेल्यावर बरोबर रात्री बारा वाजता मी गुडघ्यावर बसून त्याला प्रपोज केले." 
समीर आणि शारिका मे महिन्यात लग्न करणार असून त्यांचा विवाह ख्रिश्चन पद्धतीने होणार आहे. समीरची आई ख्रिश्चन असल्याने त्यांनी या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेस शारिका ही काश्मिरी पंडित असल्याने ते काश्मिरी पद्धतीनेदेखील लग्न करणार आहेत. 

Web Title: Shabbir Ahuwaliya's brother Sameer Ahuwalia is married to Nagin Fame Sharaika Raina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.