"OYO सोबत Shadi.com"; नवीन 'शार्क'च्या एंट्रीवर नेटीझन्सने घेतली मजा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 10:50 AM2023-10-03T10:50:15+5:302023-10-03T11:05:10+5:30

बिझनेस रिअॅलिटी शो म्हणून शार्क टँकचे दोन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

''Shadi.com with OYO''; Netizens enjoyed the entry of the new 'Shark' ritesh agrawal in shark tank 3 | "OYO सोबत Shadi.com"; नवीन 'शार्क'च्या एंट्रीवर नेटीझन्सने घेतली मजा

"OYO सोबत Shadi.com"; नवीन 'शार्क'च्या एंट्रीवर नेटीझन्सने घेतली मजा

googlenewsNext

टेलिव्हीजन इंडस्ट्रीजमधील रिअॅलिटी शो शार्क टँकचे पहिले दोन सीझन लोकप्रिय झाल्यानंतर आता तिसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे, साहजिक या तिसऱ्या भागात काही बदल झालेत का, नवीन उद्योजक पॅनेल मेंबर म्हणून आले आहेत का, किंवा पहिल्या पॅनेलपैकी कोणाची गच्छंती झालीय का, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. त्यातच, आता शार्क टँक ३ सिझनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये, शार्क टँकच्या पॅनेल ग्रुपमध्ये आता OYO च्या संस्थापकांची एन्ट्री झाली आहे. सिझन ३ मध्ये रितेश अग्रवाल हेही शार्कच्या खुर्चीवर बससेले दिसून येतील. 

बिझनेस रिअॅलिटी शो म्हणून शार्क टँकचे दोन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या दोन्ही सिझनमधून कोट्यवधींची गुंतवणूक करत येथील बिझनेसमनने नव्या उद्योजकांना आर्थिक मदत केलीय. नव्या स्टार्टप आयडियांना आर्थिक मदत देऊन नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं काम या शोच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे, हा शो अल्पावधीतच लोकप्रिय बनला. त्यातच, सर्वच उद्योगपती शार्क टँकचे हावभाव, त्यांचे डायलॉगही फेमस बनले आहेत. अनेकदा सोशल मीडियावर याचे मिम्सही व्हायरल होतात. आता, या शो मध्ये OYO संस्थापक रितेश अग्रवाल यांची एंन्ट्री झाली आहे. त्यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली. विशेष म्हणजे या 'शो'मध्ये रितेश हे सर्वात कमी वयाचे शार्क असणार आहेत. 

काय म्हणाले रितेश अग्रवाल?

"जेव्हा मी उद्योजक म्हणून सुरुवात केली, तेव्हा साधनांची कमतरता होती. स्टार्टअप इकोसिस्टममध्ये प्रत्येकाच्या मदत करण्याच्या स्वभामुळे मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली," असं रितेश अग्रवाल यांनी म्हटलं. ज्याप्रकारे त्यांना इतरांनी मदत केली, त्याप्रमाणे मलाही इतरांची मदत करायची आहे, असे त्यांचं म्हणणं आहे. आपण अनेक स्टार्टअप्सना मदत केली आहे. Naropa Fellowship द्वारे आपण अनेक उद्योजकांना मदत केली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच, शार्क टँक ३ साठी मी खूप उत्सुक आहे, असेही ते म्हणाले. 

नेटीझन्सने घेतली मजा

रितेशच्या एन्ट्रीमुळे नमिथा थापरचा शोमधील पत्ता कट झाल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. कारण, सिझन ३ च्या प्रोमोमध्ये नमिथा दिसत नसून रितेशच्या एंट्रीला टाळ्या होत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटीझन्सने OYO आणि लग्न यावरुन मजेशीर कमेंट केल्या आहेत. जेव्हा OYO आणि शादी डॉट कॉम समोरासमोर येतील, अब आयेगा मजा.. अशा कमेंटही नेटीझन्सने केल्या आहेत. दरम्यान, तिसऱ्या सिझनमध्येही अशनीर ग्रोवरची अनुपस्थिती चाहत्यांना निराश करुन गेली. कारण, अशनीर यांचे मजेशीर प्रेझेंटेशन अनेकांना भावले होते. 
 

Web Title: ''Shadi.com with OYO''; Netizens enjoyed the entry of the new 'Shark' ritesh agrawal in shark tank 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.