सुनिल ग्रोव्हरच्या शोमध्ये पहिला पाहुणा असणार शाहरूख खान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 02:51 PM2018-11-22T14:51:59+5:302018-11-22T14:54:04+5:30
सुनील ग्रोवर आपल्या अंदाजाने रसिकांचे मनोरंजन करताना दिसेल. ‘कानपूर वाले खुराणाज्’या शोच्या माध्यमातून सुनील ग्रोवरचा फुल ऑन कॉमेडी अंदाज पुन्हा एकदा रसिकांना पाहता येणार आहे.
रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्यासाठी कॉमेडीयन सुनील ग्रोवर लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ‘कानपूर वाले खुराणाज्’असे या शोचे नाव आहे. स्टारप्लस चॅनेलवर हा शो सुरू होणार आहे. ह्या शोमध्ये बॉलीवूडमधील सुपरस्टार्स भेट देतील. असाच एक पाहुणा असणार आहे बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खान.ह्या शोमध्ये सुनिल ग्रोव्हर जिजाच्या रूपात शाहरूखसोबत दिसून येईल.कॉमेडियन सुनिल ग्रोव्हरसोबत स्टारप्लसवरील ‘कानपूर वाले खुराणाज्’मध्ये कॉमेडी मास्टर्स अलि असगर, सुरेश मेनन आणि उपासना सिंग हे प्रेक्षकांचे मनोरंजन करतील.
केवळ 12-15 एपिसोडची ही सिरीज असणार आहे. विशेष म्हणजे या सिरीजमध्ये बॉलिवूड सेलिब्रेटींचाही सहभाग असणार आहे. या शोची संकल्पना कपिल शर्मा शो सारखीच असल्याचे सांगण्यात येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शोला कपिल शर्माची एक्स गर्लफ्रेंड आणि एक्स क्रिएटिव हेड प्रीति सिमोसच निर्मिती करत आहे. डिसेंबरमध्ये हा शो रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे चर्चा आहेत. शाहरुख खान आणि रणवीर सिंह सुनील ग्रोवरचे पहिले पाहुणे असणार आहेत. ज्यांच्याबरोबर सुनील ग्रोवर आपल्या अंदाजाने रसिकांचे मनोरंजन करताना दिसेल. या शोच्या माध्यमातून सुनील ग्रोवरचा फुल ऑन कॉमेडी अंदाज पुन्हा एकदा रसिकांना पाहता येणार आहे.
सुनिल ग्रोवर पाठोपाठ कपिल शर्माही दणक्यात कमबॅक करणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून रंगली होती. सोनी टीव्हीनेही या वृत्ताला काही आठवड्यांपूर्वीच दुजोरा दिला होता. या कार्यक्रमाची तयारीही सुरू झाली असून या महिन्यातच कपिल त्याच्या शोसह परतणार असल्याचे म्हटले जात आहे.
‘द कपिल शर्मा शो’ मधून कपिल शर्मा परतणार असला तरी हा शो एका नव्या रूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे चॅट शो हे स्वरूप कायम ठेवून अन्य काही बदल या शोमध्ये करण्यात येतील. अगदी आगळ्यावेगळ्या रूपात हा शो प्रेक्षकांसमोर येईल अशी चर्चा रंगली आहे.