​टेड टॉक्स इंडिया नई सोच या कार्यक्रमामुळे शाहरुख खानचे हे स्वप्न झाले पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 10:43 AM2017-12-21T10:43:40+5:302017-12-21T16:13:40+5:30

गेली दोन दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या शाहरूख खानची सारी स्वप्ने आता पूर्ण झाली असतील, अशीच कोणाचीही समजूत असेल. ...

Shah Rukh Khan's dream of becoming TED Talks India New Thinking Program | ​टेड टॉक्स इंडिया नई सोच या कार्यक्रमामुळे शाहरुख खानचे हे स्वप्न झाले पूर्ण

​टेड टॉक्स इंडिया नई सोच या कार्यक्रमामुळे शाहरुख खानचे हे स्वप्न झाले पूर्ण

googlenewsNext
ली दोन दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या शाहरूख खानची सारी स्वप्ने आता पूर्ण झाली असतील, अशीच कोणाचीही समजूत असेल. पण ही गोष्ट तितकीशी खरी नाही. शाहरुखचे अनेक वर्षांपासूनचे एक स्वप्न होते. पण त्याचे हे स्वप्न त्याला आजवर पूर्ण करता आले नव्हते. त्याचे हे स्वप्न टेड टॉक्स इंडिया नई सोच या कार्यक्रमामुळे पूर्ण झाले. त्यामुळे तो सध्या चांगलाच खूश आहे. टेड टॉक्स इंडिया नई सोच या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रसिद्ध पर्क्युशनिस्ट शिवमणी हजेरी लावणार आहे. त्याने या कार्यक्रमासाठी नुकतेच चित्रीकरण केले. या कार्यक्रमात शिवमणीला शंख फुंकताना पाहून शाहरूख थक्क झाला होता. ड्रम्स, ऑक्टोबान, दारबुका, उदुकाई आणि खंजिरी यांसारखी अनेकविध वाद्ये वाजवण्यात पारंगत असलेल्या शिवमणीने या कार्यक्रमात शंख हे वाद्य वाजवून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शिवमणीच्या शंखनादाने उपस्थित प्रचंड भारावून गेले होते. त्यांनी यानंतर ‘हर हर महादेव’ या घोषणा देखील दिल्या. या घोषणांमध्ये नकळत शाहरुख देखील सामील झाला. 
टेड टॉक्स इंडिया नई सोच या कार्यक्रमात नवनव्या गोष्टी शिकण्यासाठी लोकांना नेहमीच प्रवृत्त केले जाते. शाहरुखला देखील या कार्यक्रमात एक नवीन गोष्ट शिकण्याची संधी मिळाली. शंख कसा वाजवायचा हे शाहरूख खान या कार्यक्रमात शिकला. त्याने या कार्यक्रमात शंख देखील वाजवून दाखवला. त्याला शंख वाजवायला शिवमणीने शिकवले असल्यामुळे तो खूपच खूश झाला होता. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणानंतर शाहरुख खूपच आनंदित दिसला. या चित्रीकरणाविषयी शाहरूख खान सांगतो, “मला कोणतं तरी संगीत वाद्य शिकण्याची इच्छा होती. मला अनेक वर्षांपासून शंख फुंकायचा होता. पहिल्याच प्रयत्नात मला ही गोष्ट साध्य करायची होती आणि या कार्यक्रमात माझे हे स्वप्न पूर्ण झाले यासाठी मला प्रचंड आनंद होत आहे.
टेड टॉक्स इंडिया नयी सोच या कार्यक्रमाची टीम आणि शाहरुख खान भारतीय प्रेक्षकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे करणार आहेत. अधिक चांगल्या उद्यासाठी हा कार्यक्रम नक्कीच मदत करणार आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील कल्पनांकडे हा शो वेगळ्‌या दृष्टिकोनातून पाहायला लोकांना शिकवणार आहे. 

Also Read : या कारणामुळे कुछ कुछ होता है या चित्रपटाचे लिखाण करायला जावेद अख्तर यांनी दिला होता नकार

Web Title: Shah Rukh Khan's dream of becoming TED Talks India New Thinking Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.