एरिका फर्नांडिससोबतच्या नात्याबाबत शाहीर शेखने दिले हे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 17:21 IST2019-03-11T17:15:57+5:302019-03-11T17:21:28+5:30
एरिका आणि शाहीर मालिकेत एकत्र काम करत नसले तरी आजही ते एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. याचमुळे एरिका आणि शाहीरमध्ये प्रेमप्रकरण सुरू असून ते लवकरच लग्न करणार आहेत अशा बातम्या नेहमीच वाचायला मिळतात.

एरिका फर्नांडिससोबतच्या नात्याबाबत शाहीर शेखने दिले हे स्पष्टीकरण
कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेतील देव, सोनाक्षी या व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेने शाहीर शेख आणि एरिका फर्नांडिस यांना रातोरात स्टार बनवले. ही मालिका सुरू असतानाच शाहीर शेख आणि एरिका फर्नांडीस यांच्यात मैत्रीपेक्षा जास्त काही तरी असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण या दोघांनी त्यावेळी त्यांच्या नात्यावर मौन राखणेच पंसत केले होते. सध्या एरिका कसौटी जिंदगी की या मालिकेत तर शाहीर ये रिश्ते है प्यार के या मालिकेत काम करत आहेत.
एरिका आणि शाहीर मालिकेत एकत्र काम करत नसले तरी आजही ते एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. याचमुळे एरिका आणि शाहीरमध्ये प्रेमप्रकरण सुरू असून ते लवकरच लग्न करणार आहेत अशा बातम्या नेहमीच वाचायला मिळतात. या अफवांना कंटाळून एरिकाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली होती. तिने म्हटले होते की, आजवर या चर्चांवर मी गप्प राहाणेच पसंत केले होते. पण आता मी विनंती करून सगळ्यांना सांगू इच्छिते, की कोणाच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवताना १०० वेळा विचार करणे गरजेचे आहे. आम्ही दोघे खूप चांगले फ्रेंड्स आहोत. केवळ वर्तमानपत्रांचे रकाने भरण्यासाठी अशाप्रकारच्या बातम्या कोणीही पसरवू नये.
एरिकाच्या या वक्तव्यानंतर शाहीरने देखील बॉलिवूडलाइफ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या नात्याविषयी सांगितले आहे. शाहीर सांगतो, आमच्यात असे काहीही नाहीये. वर्तमानपत्राच्या बातम्यांचा विचार केला तर मी आतापर्यंत अनेक स्त्रियांना डेट केले आहे. माझी दोन ते तीन लग्न झालेली आहेत. पण अशा बातम्यांकडे मी दुर्लक्ष करतो. मी आणि एरिकाने अनेकवेळा आमच्यात मैत्रीशिवाय दुसरे काहीही नसल्याचे मुलाखतींमध्ये सांगितले आहे. पण तरीही अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात. माझ्या लग्नाबद्दल विचाराल तर माझी आई कित्येक महिन्यांपासून माझ्यासाठी मुली पाहात आहे. पण केवळ कुटुंब अथवा समाजाच्या दबावामुळे मला लग्न करायचे नाहीये. मी जोपर्यंत लग्नासाठी पूर्णपणे तयार होत नाही तोपर्यंत कोणत्याही बंधनात अडकायचे नाही असा मी विचार केला आहे.