छोट्या पडद्याचा शाहरूख खान दिशंक अरोराने हेलिकॉप्टरमधून केली एंट्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 11:16 AM2018-02-19T11:16:10+5:302018-02-19T16:46:10+5:30
अभिनय करणे प्रत्येक कलाकारसाठी आव्हानात्मक असेत.शेवटी आपल्या आपल्या अभिनयातून रसिकांचे मनोरंजन होणे हेच महत्त्वाचे असते.प्रत्येक कलाकार आपापल्या अभिनयकौशल्याने रसिकांची ...
अ िनय करणे प्रत्येक कलाकारसाठी आव्हानात्मक असेत.शेवटी आपल्या आपल्या अभिनयातून रसिकांचे मनोरंजन होणे हेच महत्त्वाचे असते.प्रत्येक कलाकार आपापल्या अभिनयकौशल्याने रसिकांची मनं जिंकण्याचे प्रत्येकवेळी प्रयत्न करत असतो. त्यातही अनेक प्रकारच्या अभिनयगुणांनी परिपूर्ण असलेल्या या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणे हे तर अधिकच अवघड आहे.तसेच ब-याचदा कलाकारांना कथेच्या मागणीनुसार अगदी कठीण स्टंट करत दिलेला सिन पूर्ण करण्याच्या आव्हानांनाही ब-याचदा समोरे जावे लागते.नुकतेच ‘जीजी माँ’ मालिकेतील एका विवाहाच्या प्रसंगासाठी सर्व कलाकार अलीकडेच राजस्थानातील जयपूरमध्ये चित्रीकरण करीत होते.त्यात सुयश रावत या नवर्या मुलाची भूमिका साकारणारा दिशंक अरोराने मोठ्या ऐटीत आपले आगमन केले! विवाहासाठी नव-या मुलाचे आगमन दणक्यात आणि नेत्रदीपक पध्दतीने व्हावे,असे मालिकेच्या निर्मात्यांनी ठरविले होते.त्यासाठी हेलिकॉप्टरमधून त्याचे आगमन होईल,असे ठरविण्यात आले. मात्र चित्रीकरणाच्या वेळी जोरदार वारा वाहू लागल्याने हेलिकॉप्टरच्या वैमानिकाने सुरुवातीला ते जमिनीवर उतरविण्यास नकार दिला.त्यामुळे चित्रीकरण
काही काळ खोळंबून राहिले. पण मालिकेचे निर्माते जय मेहता यांनी वरिष्ठ अधिका-यांकडून मंजुरी मिळविली आणि ते
चित्रीकरण पार पाडले. जय मेहता यांनी सांगितले, “दिशंक हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे. तो प्रत्येक गोष्ट शक्यो परिपूर्णतेने करतो.या धोकादायक स्थितीतही तो हा प्रसंग साकारण्यास तयार झाला आणि त्याने तो उत्तमरीत्या दिला आहे. हेलिकॉप्टरमधून उतरतानाही त्याने आधार घेण्यास नकार दिला आणि तो अतिशय ऐटीत बाहेर पडला.त्याने एकाच फटक्यात अगदी उत्तम शॉट पूर्ण केल्याने युनिटचे सर्व कर्मचारी आनंदित झाले होते.”या प्रसंगाबद्दल दिशंकने सांगितले, “हेलिकॉप्टरमधला माझा हा पहिलाच प्रसंग होता आणि मी स्वत:च वैमानिक असल्यासारखा वागलो.यावेळी आमच्या निर्मात्याने स्वाकारलेल्या अटी आणि शर्ती यांची मला कल्पना होती.हा एक तसा धोकादायकच प्रसंग होता. पण हा धाडसी प्रसंग साकारावा आणि पूर्वी कधी न घेतलेला अनुभव घ्यावा,अशी माझी इच्छा होती. हा प्रसंग अखेरीस साकार झाला, यामुळे आम्ही सर्वजण खुश झालो. आता प्रेक्षकांना माझा हा हेलिकॉप्टरमधून केलेला धडाकेबाज प्रवेश आवडो, हीच इच्छा.”