शाहरूख खान सांगतोय, हे काम करणे होते माझ्यासाठी खूप कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 11:04 AM2017-12-08T11:04:21+5:302017-12-08T16:34:21+5:30
कोणाला स्वप्नातही असे वाटणार नाही की, बॉलिवूडमधील किंग खान शाहरूखलाही कोणती गोष्ट कठीण वाटू शकते, कारण ऑनस्क्रीन तो खूपच ...
क णाला स्वप्नातही असे वाटणार नाही की, बॉलिवूडमधील किंग खान शाहरूखलाही कोणती गोष्ट कठीण वाटू शकते, कारण ऑनस्क्रीन तो खूपच सहजपणे वावरतो. पण अशीही एक गोष्ट आहे, ज्यामुळे शाहरूखची सध्या झोप उडाली आहे. शाहरुखची कोणत्या गोष्टीने झोप उडवली आहे हे तुम्हाला कळल्यावर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसणार आहे.
स्टार प्लसवरील टेड टॉक्स इंडिया नयी सोच हा कार्यक्रम स्वीकारल्यानंतर या शोसाठी तयारी करणे शाहरूखला खूपच कठीण जात आहे. याविषयी शाहरूख सांगतो, “हा कार्यक्रम माझ्या करिअरमधील सगळ्यात वेगळा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात काम करणे माझ्यासाठी खूप कठीण आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.”
टेड टॉक्स इंडिया नयी सोच या कार्यक्रमाची टीम आणि शाहरुख खान भारतीय प्रेक्षकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे करणार आहेत. अधिक चांगल्या उद्यासाठी हा कार्यक्रम नक्कीच मदत करणार आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील कल्पनांकडे हा शो वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लोकांना शिकवणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रत्येक वीकेन्ड्सना काही यशस्वी इनोव्हेटर्स आणि वक्ते शाहरुख खानसोबत या कार्यक्रमाची सध्या तयारी करत आहेत.
टेड टॉक्स या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती नव्या संकल्पना आणि सिद्धांत मांडतील. परंतु ‘टेड टॉक परिषदां’पेक्षा हा कार्यक्रम वेगळा असेल. त्या परिषदांचे प्रसारण कंपनीतर्फे केले जाते आणि ते टीव्ही कार्यक्रम म्हणून गणले जात नाहीत. शाहरूखचा कार्यक्रम हा या कंपनीने खास टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी तयार केलेला पहिलाच कार्यक्रम आहे.
शाहरुख खानने दिवाना या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने आजवरच्या त्याच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. दिल तो पागल है, दिलवाले दुल्हनिया ले जाएेंगे, चक दे, स्वदेश, कुछ कुछ होता है यांसारख्या चित्रपटांमध्ये शाहरुखने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याला आज बॉलिवूडचा किंग मानले होते. अथक मेहनत घेण्याची त्याची तयारी आणि तो जे काही करतो त्यामध्ये सर्वोत्तम बनण्याची आकांक्षा यामुळेच तो बॉलिवूडचा सुपरस्टार बनला आहे.
Also Read : बॉलिवूडमधले हे तीन महान कलाकार दिसणार होते एक चित्रपटात एकत्र