तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये हा अभिनेता साकारणार होता भिडेची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 11:28 AM2018-08-02T11:28:48+5:302018-08-03T06:00:00+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीतील एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या मालिकेत ही भूमिका मंदार चांदवलकर साकारतो. गेल्या दहा वर्षांत मंदार हा प्रेक्षकांचा प्रचंड लाडका बनला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की या मालिकेत भिडेची भूमिका मंदार नव्हे तर एक दुसरा अभिनेता साकारणार होता.
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेचे नुकतेच दहा वर्षं पूर्ण झाले आहेत. कोणत्याही कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेला दहा वर्ष झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीतील एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या मालिकेत ही भूमिका मंदार चांदवलकर साकारतो. गेल्या दहा वर्षांत मंदार हा प्रेक्षकांचा प्रचंड लाडका बनला आहे. मंदारला या मालिकेने एक नवी ओळख मिळवून दिली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, की या मालिकेत भिडेची भूमिका मंदार नव्हे तर एक दुसरा अभिनेता साकारणार होता. पण हा अभिनेता दुसऱ्या एका प्रोजेक्टमध्ये व्यग्र असल्याने त्याला ही भूमिका साकारता आली नाही आणि या भूमिकेसाठी मंदारची वर्णी लागली. मंदारने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेआधी अनेक मालिकांमध्ये काम केले होते. पण या मालिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. मंदारची ही भूमिका शैलेश दातार हा अभिनेता साकारणार होता. शैलेशने झांसी की राणी, उंच माझा झोका यांसारख्या अनेक मराठी, इंग्रजी मालिकांमध्ये देखील काम केले आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीतील सगळे सदस्य हे एखाद्या कुटुंबियांसारखे असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. खऱ्या आयुष्यात देखील ही मंडळी एखाद्या कुटुंबियांसारखी असून ते अनेकवेळा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या सगळ्यांची कुटुंबं देखील त्यांच्यासोबत असतात.