'तारक मेहता...'चा वाद कोर्टात, शैलेश लोढांनी निर्मात्यांविरोधात दाखल केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 04:37 PM2023-04-20T16:37:32+5:302023-04-20T16:38:43+5:30

अभिनेते शैलेश लोढा यांनी मालिका सोडून वर्ष झालं आहे.

shailesh lodha registers complaint against tarak mehta ka ulta chashma makers now matter is in court | 'तारक मेहता...'चा वाद कोर्टात, शैलेश लोढांनी निर्मात्यांविरोधात दाखल केली तक्रार

'तारक मेहता...'चा वाद कोर्टात, शैलेश लोढांनी निर्मात्यांविरोधात दाखल केली तक्रार

googlenewsNext

तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही लोकप्रिय मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. घरोघरी ही मालिका पाहिली जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत या मालिकेचे चाहते आहेत. मात्र सध्या मालिकेतील काही पात्र बदलली आहेत. महत्वाची भूमिका साकारणारे तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा (Shailesh Lodha)  यांनीच गेल्या वर्षी मालिका सोडली. मालिकेच्या निर्मात्यांवर मानधन न दिल्याचे आरोप त्यांनी केले. आता हे प्रकरण कोर्टात जाऊन पोहोचले आहे.

अभिनेते शैलेश लोढा यांनी मालिका सोडून वर्ष झालं आहे. मात्र अद्याप त्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. यावरुन त्यांनी अनेकदा भाष्य केलं आहे. मात्र आता लोढा यांनी कायदेशीर मार्ग अवलंबवत निर्माते असीत मोदींना (Asit Modi) कोर्टात खेचलं आहे. त्यांनी असीत मोदींविरोधात रितसर तक्रार दाखल केली आहे. तसंच प्रोडक्शन कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणी मे महिन्यात कोर्टात सुनावणी होणार आहे. शैलेश लोढा यांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे कलम ९ अंतर्गत कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रेजोल्युशन सुरु केले आहे. असित मोदींनी पूर्ण पेमेंट न केल्याने या प्रकरणी ही सुनावणी होईल. आता प्रकरण कोर्टात असल्याने शैलेश लोढा यांनी यावर बोलण्यास नकार दिलाय. 

मालिकेचे प्रोजेक्ट हेड सोहिल रमानी यांनी या प्रकरणावर बोलताना सांगितले,'शैलेश लोढा आम्हाला कुटुंबासारखेच आहेत. जेव्हा त्यांनी मालिका सोडली आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदरच केला. अनेकदा फोन आणि ईमेलच्या माध्यमातून आम्ही त्यांना ऑफिसमध्ये येऊन काही कागदपत्रांवर सही करण्याची विनंती केली. यानंतर तुमचे पैसे घेऊन जा असे सांगितले. आम्ही कधीच त्यांना पैसे देण्यास नकार दिला नाही. कंपनी सोडताना काही कागदपत्रांवर सही करणं गरजेचं असतं. दुसरीकडे जाऊन तक्रार करण्यापेक्षा नियमांचं पालन करणं योग्य नाही का?

Web Title: shailesh lodha registers complaint against tarak mehta ka ulta chashma makers now matter is in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.