'शाका लाका बूम बूम' च्या संजूला हळद लागली, जाणून घ्या होणारी बायको कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 15:50 IST2024-11-22T15:39:31+5:302024-11-22T15:50:34+5:30
किंशुक वैद्य त्याची दीर्घकाळची मैत्रीण दीक्षा नागपालसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे.

'शाका लाका बूम बूम' च्या संजूला हळद लागली, जाणून घ्या होणारी बायको कोण?
Kinshuk Vaidya : 'शका लाका बूम बूम' या टीव्ही शोमधला संजू आठवतोय का? 'शका लाका बूम बूम' मालिका अनेकांच्या बालपणीचा भाग आहे. यात संजूची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे नाव किंशुक वैद्य (Kinshuk Vaidya) आहे. किंशुक आता खूप मोठा आणि देखणा झाला आहे. त्याने आता आपला जोडीदारही निवडला आहे. किंशुक वैद्य लग्नबंधनात अडकतोय. त्याच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.
किंशुक वैद्य त्याची दीर्घकाळची मैत्रीण दीक्षा नागपालसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे. ETimes च्या रिपोर्टनुसार, किंशुक वैद्य आणि दीक्षा नागपाल यांच्या लग्नाचा सोहळा अलिबागमध्ये पार पडतोय. अभिनेत्याने त्याच्या लग्नाची घोषणा केली नसली तरी त्यांच्या मित्रांनी हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात किंशुक आणि दीक्षा हे हळदीने माखलेले दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
किंशुक आणि दीक्षा यांचा साखरपूडा गेल्या ऑगस्टमध्ये झाला होता. किंशुक वैद्य आणि दीक्षा नागपाल एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत होते. किंशुकच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्याने 'शका लाका बूम बूम', 'कर्णसंगिनी', 'वो तो है अलबेला', 'जात ना पूछे प्रेम की', 'राधाकृष्ण', 'वो अपना सा', 'एक रिश्ता साझेदारी का' या मालिकांमध्येही काम केले आहे. दीक्षा नागपालच्या आधी तो शिव्या पठानियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, 2021 मध्ये ते विभक्त झाले. दीक्षा एक प्रोफेशन्ल कोरियोग्राफर आहे. ती टीव्ही, ओटीटी आणि सिनेमांमध्ये तिच्या कामासाठी प्रसिद्ध आहे.