राकेश बापटपाठोपाठ शमिता शेट्टीही ‘Bigg Boss 15’मधून बाहेर; हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 04:12 PM2021-11-15T16:12:56+5:302021-11-15T16:13:41+5:30
Bigg Boss 15 : शमिता शेट्टी ‘बिग बॉस 15’मधून बाहेर पडली आहे. अर्थात ती लवकरच पुन्हा शोमध्ये परतणार असल्याचे कळतेय.
‘बिग बॉस 15’मध्ये ( Bigg Boss 15) अलीकडे वाईल्ड कार्डद्वारे राकेश बापटची (Raqesh Bapat) एन्ट्री झाली होती. त्याला पाहून त्याची ‘लेडीलव्ह’ शमिता शेट्टीचा (Shamita Shetty ) आनंद गगणात मावेनासा झाला होता. शमिता आधीच बिग बॉसच्या घरात होती. अशात राकेश आल्याने तिला मोठा आधार मिळाला होता. पण राकेश घरात येऊन काही दिवस होत नाही तोच त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला थेट रूग्णालयात हलवावं लागलं. तो बरा होऊन बिग बॉसच घरात परतेल, अशी अपेक्षा होती. पण राकेशने बिग बॉसच्या घरात न परतण्याचा निर्णय घेतला आणि तो शोमधून बाद झाला. आता काय तर त्याच्यापाठोपाठ शमिता शेट्टीही ‘बिग बॉस 15’मधून बाहेर पडली आहे. अर्थात ती लवकरच पुन्हा शोमध्ये परतणार असल्याचे कळतेय.
Hi ALL Shamzis loved ones - United we stand& r strong,calm down Shamzis med tests reqd -she wl b back soon. Pl send her yr love,light protection & blessings as I believe it’s v powerful.luv you all..❤️🧿🙌🌺🧿 #ShamitaShetty#ShaRa#Shamitastribe#BiggBoss15#OrmaxMedia#Shamitapic.twitter.com/jIRpngb0r4
— Sunanda Shetty (@SunandaShetty5) November 14, 2021
राकेश बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्यावर शमिता शेट्टी ढसाढसा रडताना दिसली होती. पण आता ती सुद्धा शोमधून बाहेर पडली आहे. शमिताची आई सुनंदा शेट्टी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शिवाय तिच्या शोमधून बाहेर पडण्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे.
सुनंदा यांनी ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. ‘शमिताच्या काही आवश्यक मेडिकल टेस्ट होणार होत्या. त्यामुळे ती बिग बॉस 15 मधून बाहेर आली आहे. ती लवकरच शोमध्ये वापसी करेल,’अशा आशयाचं ट्विट सुनंदा यांनी केलं आहे.
‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात शमिता आणि राकेश बापट यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री चर्चेचा विषय बनली होती. सध्या राकेश बापट हा शमिता शेट्टीचा बॉयफ्रेन्ड म्हणून ओळखला जातोय. ‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर पडल्यानंतरही शमिता व राकेश एकत्र दिसले होते. बिग बॉसने नुकतीच घरामध्ये राकेश-शमितासाठी एक सुंदर डेट आयोजित केली होती. दोघेही घरातील इतर सदस्यांव्यतिरिक्त एकमेकांसोबत वेळ घालवताना खूप आनंदी दिसत होते.