शमता आंचन आणि निखिल सबरवालची बिन कुछ कहेच्या सेटवर धमाल मस्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2017 09:20 AM2017-05-16T09:20:41+5:302017-05-16T14:50:41+5:30
मालिकेचे कलाकार त्यांचा अधिकाधिक वेळ हा मालिकेच्या सेटवर घालवत असतात. त्यामुळे या कलाकारांमध्ये अनेक वेळा खूप चांगली मैत्री होते. ...
म लिकेचे कलाकार त्यांचा अधिकाधिक वेळ हा मालिकेच्या सेटवर घालवत असतात. त्यामुळे या कलाकारांमध्ये अनेक वेळा खूप चांगली मैत्री होते. बिन कुछ कहे या मालिकेत शमता आंचन आणि निखिल सबरवाल आपल्याला प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. ते दोघे गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांसोबत चित्रीकरण करत आहेत. या चित्रीकरणा दरम्यान ते दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आहेत. हे दोघे मिळून सेटवर सगळ्यांना खूप सतवतात. त्यामुळे त्यांना मालिकेच्या सेटवर प्रँगस्टरचा किताब देण्यात आला आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी मालिकेची संपूर्ण टीम जयपूरमधील एका व्हिलामध्ये राहात होती. त्यावेळी निखिल शमतासोबत खूप मस्करी करायचा. तो आपल्या मोबाईलमधून विचित्र आवाज काढायचा. हे आवाज ऐकून एखाद्याला बेसिक मॅनर्सदेखील नसावेत असे तिला वाटायचे. पण काही दिवसांनी तोच तिच्यासमोर जोराजोरत हसला आणि तो तिच्यासोबत मस्करी करत असल्याचे शमताच्या लक्षात आले. पण यानंतर शमताने त्याची टर उडवण्याचे ठरवले. या मालिकेच्या चित्रीकरणातून ब्रेक मिळाल्यामुळे शमता आणि निखिल जयपूरमधील एका चित्रपटगृहात चित्रपट पाहायला गेले होते. त्यावेळी शमताने त्याला चांगलेच घाबरवले. निखिल प्रचंड घाबरट असल्याने तो भूताचे चित्रपट पाहात नाही हे तिला चांगलेच माहीत होते. त्यामुळे चित्रपटगृहातील अंधाराचा फायदा घेऊन शमताने निखिलला घाबरवायचे ठरवले. चित्रपटगृहात प्रवेश करताना मला एक काम आहे असे कारण देऊन ती मागे राहिली आणि त्यामुळे चित्रपटगृहात निखिल एकटा जायला लागला त्याेळी तिने मागून उडी मारून मोठा आवाज करून त्याला घाबरवले. याविषयी निखिल सांगतो, मी आणि शमता दोघेही मस्तीखोर असल्याने सेटवर आम्हाला दोघांना काम करताना प्रचंड मजा येते.