शंकर महादेवन म्हणतात, रिऑलिटी शो ही एक सुर्वणसंधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 06:17 AM2018-02-01T06:17:04+5:302018-02-01T11:47:09+5:30
कलर्सच्या या रायझिंग स्टार 2 मध्ये यावेळी विशेष काय आहे? या शोच्या पुढच्या सीझनची अतिशय लोकप्रिय मागणी पाहून आम्हाला ...
या शोच्या पुढच्या सीझनची अतिशय लोकप्रिय मागणी पाहून आम्हाला अतिशय आनंद होत आहे- त्यामुळे आम्ही पुन्हा परत आलो आहोत धडाक्यात. एका तासाचा कालावधी असणारा निःसंदिग्धता असलेला आंतरराष्ट्रीय स्वरुपावर आधारीत असलेला हा शो भारतीय स्वादामध्ये नक्कीच वेगळा आहे. हा खराखुरा लाइव्ह आहे यात उशीर किंवा स्थगित लाइव्ह असे काही नाही आणि त्यात रिटेक सुध्दा नाहीत. एखादी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मॅच जशी लाइव्ह खेळली जाते अंपायर सोबत प्रेक्षकांसमोर तसेच. वयाची अट नाही, लिंग, जात यांचे अडथळे नाहीत, मुलांपासून ते वृध्दांपर्यंत कोणताही सामान्य पुरूष किंवा महिला त्यांचे शुध्द कौशल्य दाखवू शकतात. येथे रायझिंग सोचकी दीवार- द वॉल ऑफ फेम आहे, जे गायकांना शब्दशः वर उचलणार आहेत, प्रेक्षकांचा प्रत्येक वेळी प्रतिसाद वेगळा असणार आहे. आपल्या मनात असणारे एखाद्या लोकांविषयी किंवा व्यवसाया विषयी असणारे चुकीचे समज किंवा पक्षपातीपणा येथे सुसंगतपणे नाहीसा केला जाणार आहे. आम आदमी- सामान्य माणसाला परफॉर्म करण्यासाठी आणि देशात त्वरीत प्रसिध्दी मिळविण्यासाठी आणि प्रमुख टिव्ही चॅनेल वर प्रसिध्दी मिळविण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे,. रुळलेल्या वाटा मोडून टाकणारा हा शो असून त्यात घरी बसून टिव्ही पाहणाऱ्या लाखो प्रेक्षकांच्या मतांचे त्याच वेळी लोकशाही मार्गाने ऑनलाइन ऑडिट करण्याची प्रक्रिया आहे. येथे कोणतेही फूटेज एडिट केले जाणार नाही किंवा हाताळण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. अशा प्रकारचा टेकसॅव्ही प्रयोग असणारा हा भारतीय टेलिव्हिजन वरील पहिलाच शो असून त्यात स्वयंप्रेरित घऱी टिव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांची व्यस्ततेचा समावेश आहे.
यावेळी कोणता उल्लेखनीय बदल करण्यात आला आहे?
या शो चे होस्ट यावेळी एक अकालप्रौढ सात वर्षांचा मुलगा-पार्थ धमिजा करणार आहे, जो असाधारण आहे, अस्खलित वाक्पटू आहे आणि एक विलक्षण गायक आहे. त्यानंतर , नामवंत अभिनेता अँकर रवि दुबे (खतरों के खिलाडी सीझन 8 चा दुसरा उपविजेता) विनोदी पंच लाइन साठी प्रसिध्द आहे. शो पुढे उलगडत असताना, आम्हाला अनेक महत्वाकांक्षी स्पर्धक पहायला मिळणार आहेत, जे जीवनातील विरोधी परिस्थितीवर शूरपणे मात करत आहेत आणि त्यातून प्रेक्षकांना प्रेरणा मिळणार आहे. स्पर्धकां मध्ये एक पोस्टवूमन सुध्दा आहे जी 55 पेक्षा जास्त वयाची आहे, जिची गायन ही पॅशन आहे.
तुमच्यासाठी आता पर्यंतचा सर्वात मोठा कृपाप्रसाद कोणता आहे?
भाग मिल्खा भाग मधील माझ्या गुणवान गायक मुलाचे सिध्दार्थचे गाणे मंचावर गाणे. आपण नेहमी पाहतो की विख्यात वडीलांचे किंवा आजोबांचे गाणे गायक मुलगा म्हणताना, पण भारतीय जेष्ठ गायक-वडील त्यांच्या स्वतःच्या मुलाचे प्रसिध्द गाणे सार्वजनिकरीत्या म्हणताना प्रथमच ऐकले असेल. हा माझ्यासाठी कृपाप्रसाद आहे
आणि त्यासाठी मी देवाचा कृतज्ञ आहे.
तुमचे प्रसिध्द ब्रेथलेस ला यावर्षी 20 वर्षे पूर्ण होत आहेत- अजून काही गुप्त योजना आहेत का?
होय, बरोबर आहे, बीस साल बाद (हसतात)! 98 च्या कालात विख्यात कवी जावेद अख्तर साब यांनी प२राबोला सारख्या अखंड गाण्याची सूचना केली होती, ज्याला कोणत्याही कठोर स्वरुपाचे बंधन नव्हते, आणि त्याने संगीतात एक इतिहास निर्माण केला होता. आम्ही यावर्षी सुध्दा या चित्तथरारक सामग्रीचा कमी वेळासाठी किंवा जास्त वेळासाठी करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत- 20 वर्षांचा टप्पा पार करण्यासाठी. दरम्यान दिग्दर्शक नागेश कुकनूर आणि मी अजून एका संगीतमय प्रकल्पावर चर्चा करत आहोत, जो आता प्राथमिक अवस्थेत आहे.
तरुण गुणवानांसाठी रिअॅलिटी टिव्ही शो एक मंच मिळवून देण्यात मदत करतात यावर तुमचे काय विचार आहेत? तसेच शो संपल्यानंतरही ते टिकून राहण्यात सक्षम आहेत असे तुम्हाला वाटते का?
हा एक सर्वात मोठा राष्ट्रीय मंच आहे, जेथे लाखो लोक तुम्हाला ऐकत असतात आणि जेव्हा हे सर्व लोक तुमचे गाणे ऐकतात तेव्हा त्यांना सुध्दा प्रेरणा मिळते आणि त्यातून जे पहात असतात त्यांच्यासाठी सुध्दा मंच तयार होत जातो. खरेतर, कोणत्याही वयाच्या, जातीच्या किंवा कोणत्याही वयोगटातील लोक तसेच विविध प्रकारचे लोक या शो मध्ये भाग घेतात ज्यातून लाइव्ह टेलिव्हिजन वर त्यांना पाहणाऱ्या इतर लोकांना सुध्दा प्रेरणा मिळते. रायझिंग स्टार 2 ची ही संकल्पना लोकांना प्रेरित करणारा फार मोठा मंच आहे आणि त्यातून तुमची स्वप्ने उमलू शकतात.
या शोने अनेक साचेबध्दता मोडून काढल्या आहेत, संगीताच्या इंडस्ट्री मध्ये खूप साचेबध्दता आहे असे तुम्हाला वाटते का? संगीतामध्ये करियर करण्यासाठी अजूनही त्यांच्या मुलांना परवानगी न देणारे अनेक लोक आहेत का?
अजूनही काही कुटुंबे आहेत जे संगीताला करियर करण्यासाठी एक पर्याय समजत नाहीत, पण जर त्यांच्या मुलामध्ये ते कौशल्य असले तर मात्र हे पालक मोकळेपणाने त्यांना प्रेरणा देतात आणि त्यांच्या करियरसाठी व एक चांगला सौंदर्याचा आस्वाद घेणारा सखोल संगीतकार होण्यासाठी पुढे ढकलतात. हे फार महत्वाचे आहे आणि या सर्व कथा पाहिल्या नंतर कोणीही त्यांच्या मुलांना शिकविण्यासाठी किंवा स्वतः स्पर्धक बनण्यासाठी प्रेरित होऊ शकतो.