‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’मध्ये शरद केळकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2017 05:26 PM2017-01-10T17:26:38+5:302017-01-10T17:26:38+5:30

आता पर्यंत छोट्या पजद्यावर अनेक राजा महाराजांवर आधारित ऐतिहासिक मालिका झळकल्या आहेत.त्याच यादीत आता लवकरच महाराजा रणजितसिंग यांच्या जीवनप्रवासावर ...

Sharad Kelkar plays the guest of 'Sher-E-Punjab: Maharaja Ranjit Singh' | ‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’मध्ये शरद केळकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत

‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’मध्ये शरद केळकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत

googlenewsNext
ा पर्यंत छोट्या पजद्यावर अनेक राजा महाराजांवर आधारित ऐतिहासिक मालिका झळकल्या आहेत.त्याच यादीत आता लवकरच महाराजा रणजितसिंग यांच्या जीवनप्रवासावर आधारित नवी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी शालीन भानोत, स्नेहा वाघ आणि सोनिया सिंह यांच्याबरोबरच इतर नामवंत कलाकारांना आधीच करारबध्द करण्यात आले आहे. या मालिकेत शरद केळकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून फक्त चर्चाच होत होत्या.मात्र अदिकृत माहिती समोर येत नव्हती. आता खुद्द या बातमीला स्वत: शरद केळकरनेच दुजोरा दिला आहे.या मालिकेत शरद बांदासिंग बहादूर या शीख सरदाराची भूमिका शरद केळकर साकारणार  आहे.

 मालिकेचा काळ 1800 सालातील असून त्यावेळी मोगलांनी पंजाबातील शीख राजवटींवर हल्ले सुरू केले. कारण ते शीख व हिंदू राजवटी उलथून पाडण्याचा प्रयत्न करीत होते. अशा काळात शूरवीर बांदासिंग बहादूर आपले राज्य व आपल्या समाजाच्या रक्षणासाठी शस्त्र हाती घेतले.या ऐतिहासिक भूमिकेविषयी शरद म्हणाला की, “आता प्रथमच कोणीतरी शीख समाजावर मालिका तयार करीत असल्याने मला त्याबद्दल खूपच उत्सुकता वाटत होती. म्हणूनच मी या मालिकेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. माझी भूमिका पाहुण्या कलाकाराची असली, तरी ही मालिका माझ्या करिअरसाठीही खूप महत्त्वाची ठरणार आहे. शिवाय मालिकेची कथा,बांधनी ही इतर मालिकांपेक्षा वेगळी आहे. कथेनुसार कलाकरांची निवड करण्यात आलीय.कलाकरांच्या लुकवरही मालिकेच्या टीमकडून खूप मेहनत घेतली जात आहे.एकूणच सगळ्या गोष्टींचा विचार करता ही भूमिका रंगविण्यास तयार झालो.”

Web Title: Sharad Kelkar plays the guest of 'Sher-E-Punjab: Maharaja Ranjit Singh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.