Bus Bai Bus Show : शरद केळकरच्या 'बाहुबली' स्टाईलमध्ये धमाल मराठी म्हणी, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 06:09 PM2022-10-22T18:09:52+5:302022-10-22T18:10:23+5:30

Sharad Kelkar : शरद केळकर त्याचा आगामी सिनेमा हर हर महादेवच्या टीमसोबत बस बाई बस लेडीज स्पेशल या कार्यक्रमात उपस्थित होता.

Sharad Kelkar's 'Baahubali' style 'Baahubali' show in 'Bus Bai Bus' shows Dhamaal Marathi sayings, watch video | Bus Bai Bus Show : शरद केळकरच्या 'बाहुबली' स्टाईलमध्ये धमाल मराठी म्हणी, पाहा व्हिडीओ

Bus Bai Bus Show : शरद केळकरच्या 'बाहुबली' स्टाईलमध्ये धमाल मराठी म्हणी, पाहा व्हिडीओ

googlenewsNext

हिंदी सिनेविश्वात उत्तम कामगिरी करणारा अभिनेता म्हणजेच  शरद केळकर.  त्याने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'बाहुबली' सिनेमामध्ये प्रभासला दिलेल्या आवाजामुळे त्याला एक नवीन ओळख मिळाली आहे. शरदला आपण अनेदका बाहुबलीच्या आवाजात बोलताना किंवा डायलॉग म्हणताना ऐकलंय. पण तुम्ही शरदला कधी बाहुबलीच्या स्टाईलमध्ये उखाणा घेताना ऐकलंय का... नाही ना... तर नुकताच शरद त्याचा आगामी सिनेमा हर हर महादेवच्या टीमसोबत झी मराठी वाहिनीवरील बस बाई बस लेडीज स्पेशल या कार्यक्रमात उपस्थित होता. यावेळी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सुबोध भावेने शदरकडून बाहुबली स्टाईलमध्ये काही धमाल मराठी म्हणी बोलून घेतल्या.

झी मराठीच्या सोशल मीडियावर बस बाई बस या शोचा प्रोमो पाहायला मिळत आहे. यातील एका प्रोमोत शरद केळकर बाहुबलीच्या आवाजात म्हणी सांगताना दिसतो आहे. या व्हिडीओत सुबोध भावे वाक्य देतो आणि त्याला बाहुबली स्टाइलमध्ये बोलायला सांगतो की शहरातलं येडं आणि भजाला म्हणतो पेढं. त्यावर शरद म्हणतो, अगं देवसना घरातलं येडं आणि भजाला म्हणतो पेढंं. त्यानंतर आणखी एक म्हण सुबोध भावे सांगतो. एक ना धड भाराभर चिंध्या. त्यावर शरद केळकर म्हणतो राजमाता शिवगामी देवी, एक ना धड भाराभर चिंध्या. बाहुबली स्टाईलमध्ये शरद केळकरच्या म्हणी ऐकून उपस्थित सर्वांना हसू कोसळलं.

शरदने लेडीज स्पेशल या कार्यक्रमात त्याच्या आयुष्यातील अनेक खुलासे केले. यावेळी त्याला त्याच्या बायकोविषयी एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्याने तो बायको घाबरत असल्याचं उत्तर दिलंय.

Web Title: Sharad Kelkar's 'Baahubali' style 'Baahubali' show in 'Bus Bai Bus' shows Dhamaal Marathi sayings, watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.