शरद केळकरची पत्नी साकारणार ‘सिमर’ !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2017 08:00 AM2017-02-24T08:00:33+5:302017-02-24T13:30:33+5:30

टीव्ही अभिनेत्री किर्ती गायकवाड केळकर लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.ससुराल सिमर का या मालिकेतून किर्तीचं तब्बल सात वर्षांनी ...

Sharad Kelkar's wife will be 'Simar'! | शरद केळकरची पत्नी साकारणार ‘सिमर’ !

शरद केळकरची पत्नी साकारणार ‘सिमर’ !

googlenewsNext
व्ही अभिनेत्री किर्ती गायकवाड केळकर लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.ससुराल सिमर का या मालिकेतून किर्तीचं तब्बल सात वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन होतंय. ससुराल सिमर का मालिकेतील प्रमुख अभिनेत्री दीपिका कक्कड या मालिकेतून एक्झिट घेणार आहे. आपल्या वैयक्तिक आणि खासगी आयुष्यावर दीपिकाला लक्ष केंद्रित करायचे असल्याने तिने ससुराल सिमर का या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.आता या मालिकेत सिमरच्या भूमिकेत किर्ती पाहायला मिळणार आहे.
 
सात वर्षांपूर्वी रसिकांनी किर्तीला सात फेरे, छोटी बहू आणि डान्स रियालिटी शो नच बलियेमध्ये पाहिलंय. अनेक मालिकांमध्ये किर्तीने निगेटिव्ह शेड असलेल्या भूमिकाही साकारल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून किर्तीला छोट्या पडद्यावर कमबॅक करायचे होतं. मात्र किर्ती एका चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत होती. गेल्या काही वर्षात छोटा पडदा खूप बदलला आहे असे किर्तीला वाटते. या काळात अनेक नवनवीन बदल छोट्या पडद्यावर झालेत. नवीन कल्पना, नवीन शो, नव्या मालिका रसिकांच्या भेटीला आल्या आहेत. पूर्वी ज्या गोष्टी रसिकांना छोट्या पडद्यावर पाहणं मान्य नव्हत्या, त्याच गोष्टींना आता रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागल्याचे किर्तीला वाटतंय. गेल्या काही वर्षात कौटुंबिक मालिकांना रसिकांचा प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यात काही चुकीचे नसल्याचे किर्तीला वाटते. त्यामुळे ससुराल सिमर का मालिकेच्या निर्मात्यांनी सिमरच्या भूमिकेसाठी विचारणा केली त्यावेळी तात्काळ होकार दिल्याचे किर्तीने सांगितले. या मालिकेत दीपिका साकारत असलेली सिमर आपण पाहिली आहे आणि ती या भूमिकेत जबरदस्त होती असं किर्तीने म्हटलं आहे. सिमरच्या भूमिकेला अनेक पैलू आहेत. मग एक खंबीर व्यक्तीमत्त्व असो किंवा आपल्या कुटुंबासाठी ठामपणे उभे राहणे असो प्रत्येक गोष्ट या भूमिकेची खास आहे. या भूमिकेला आणखी नव्या उंचीवर नेऊन कलाकार म्हणून आपल्या अभिनयक्षमतेला वाव देण्यासाठी आपण उत्साही असल्याचे किर्ती सांगते. सिमरच्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाहीसुद्धा तिने दिली आहे.किर्ती ही अभिनेता शरद केळकर याची पत्नी आहे. 2005 साली शरद आणि किर्ती रेशीमगाठीत अडकले होते. सात फेरे या मालिकेत दोघांची जोडी रसिकांना चांगलीच भावली होती. दोघांच्या आयुष्यात किशा नावाची एक सुंदर परीसुद्धा आहे.

Web Title: Sharad Kelkar's wife will be 'Simar'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.