​शरद पोंक्षे सजन रे फिर जूठ मत बोलो या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2017 10:53 AM2017-05-08T10:53:44+5:302017-05-08T16:23:44+5:30

शरद पोंक्षे यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अग्निहोत्र, दुर्वा यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका खूपच ...

Sharad Ponksa Sajan Ray Do not lie again or in the series | ​शरद पोंक्षे सजन रे फिर जूठ मत बोलो या मालिकेत

​शरद पोंक्षे सजन रे फिर जूठ मत बोलो या मालिकेत

googlenewsNext
द पोंक्षे यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अग्निहोत्र, दुर्वा यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका खूपच गाजल्या होत्या. 24 या मालिकेत त्यांनी काम केले होते. 24 या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये अनिल कपूर यांच्यासोबत त्यांनी काम केले होते. पण या मालिकेतील त्यांचे काम हे काहीच भागांचे होते. मात्र आता सजन रे फिर जूठ मत बोलो या मालिकेत ते एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
सजर रे झूठ मत बोलो ही मालिका काही वर्षांपूर्वी चांगलीच गाजली होती. या मालिकेतील मुग्धा चाफेकर, टिकू तलसानिया, सुमीत राघवन यांच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय होती. या मालिकेची लोकप्रियता पाहाता आता या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या दुसऱ्या सिझनमध्ये पहिल्या सिझनमधील टिकू तलसानिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत तर इतर नवीन कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
या मालिकेत हुसैन कुवार्जेवाला प्रमुख भूमिका साकारणार आहे तर शरद पोंक्षे अभिनेत्रीच्या वडिलांच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत काम करण्यास शरद पोंक्षे खूप उत्सुक आहेत. ते सांगतात, मी या मालिकेचा भाग असल्याबद्दल मी स्वतःला प्रचंड भाग्यवान समजत आहे. या मालिकेत मी एक खूप चांगली भूमिका साकारत आहे. या मालिकेचे चित्रीकरण करताना खूप मजा येणार आहे, याची मला खात्री आहे. या मालिकेच्या संपूर्ण टीमसोबत चित्रीकरण करण्यास मी खूपच उत्सुक आहे. 

Web Title: Sharad Ponksa Sajan Ray Do not lie again or in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.