शरद मल्होत्राची होणार 'या' मालिकेत एंट्री !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 07:15 IST2018-09-04T17:06:35+5:302018-09-05T07:15:00+5:30

अभिनेता शरद मल्होत्रा हा सध्या टीव्हीवरील सर्वात चाहता कलाकार बनला आहे, असे दिसते. ‘कसम तेरे प्यार की’ या मालिकेत तो अखेरचा दिसला होता. आता तो नवी मालिका हाती घेत आहे, असे दिसते.

Sharda Malhotra to be the 'entry' series! | शरद मल्होत्राची होणार 'या' मालिकेत एंट्री !

शरद मल्होत्राची होणार 'या' मालिकेत एंट्री !

ठळक मुद्देत्यात तो एका हिरोच्या भूमिकेत दिसेल मालिकेची नवी कथा त्याच्याभोवती केंद्रित झालेली असेल

अभिनेता शरद मल्होत्रा हा सध्या टीव्हीवरील सर्वात चाहता कलाकार बनला आहे, असे दिसते. ‘कसम तेरे प्यार की’ या मालिकेत तो अखेरचा दिसला होता. आता तो नवी मालिका हाती घेत आहे, असे दिसते. आता तो रश्मी शर्माच्या ‘मुस्कान’ मालिकेत नायकाच्या भूमिकेत दिसेल. मालिकेच्या कथानकाचा काळ पुढे नेण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असून त्यात मुस्कानच्या वडिलांची भूमिका शरद मल्होत्रा साकारणार, असे सांगितले जाते.

या मालिकेच्या कथानकाचा कायापालट करण्यात येणार असून त्यानंतर शरदचा मालिकेत प्रवेश होईल. त्यात तो एका हिरोच्या भूमिकेत दिसेल आणि तो मालिकेचे कथानक पुढे नेईल. मालिकेची नवी कथा त्याच्याभोवती केंद्रित झालेली असेल. आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “या भूमिकेसाठी शरद हा सुयोग्य आहे, असं दिसतं. टिव्हीवरील तो एक लोकप्रिय अभिनेता असून तो या मालिकेत असणं नक्कीच फायद्याचं ठरेल. कथानकाला मिळालेल्या नव्या कलाटणीनंतर त्याचा मालिकेत प्रवेश होईल.” ‘मुस्कान’ची कथा सध्या आरती आणि तिची लहान मुलगी मुस्कान यांच्या कठीण जीवनावर केंद्रित झाली आहे.

‘मुस्कान’ ही नवी मालिका आई आणि तिची मुलगी यांच्यातील नातेसंबंधांना केंद्रस्थानी ठेवलेल्या या मालिकेचा कथाभाग टीव्हीवरील नेहमीच्या सासू-सुनेच्या मालिकांपेक्षा अगदी वेगळा आहे.  काही महिन्यांपूर्वीच यात  सुदेश बेरीची एंट्री झाली आहे. या तो खलनायकाच्या भूमिकेत असून आपल्या नकळत तिथे मुस्कान ही लहान मुलगी राहात असल्याचे त्याला कळताच तो संतापतो.

Web Title: Sharda Malhotra to be the 'entry' series!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.