Shark Tank India 2 : स्पर्धकावर भडकले शार्क अनुपम मित्तल; रागानं फाडला कोटींचा चेक, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 03:08 PM2023-02-09T15:08:54+5:302023-02-09T15:09:25+5:30
Shark Tank India 2 : यावेळी 'शार्क टँक इंडिया सीझन 2' मध्ये अनुपम मित्तल आणि अमन गुप्ता अतिशय आक्रमक जजच्या भूमिकेत दिसत आहेत. ताज्या एपिसोडमध्ये अनुपम एका स्पर्धकावर भडकलेले दिसत आहेत.
Shark Tank India 2 : टीव्हीवरील लोकप्रिय बिझनेस रिअॅलिटी शो 'शार्क टँक इंडिया 2' हा सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. शोमध्ये पिचर्स नवनवीन कल्पना घेऊन येत आहेत, तर जजही त्यांना ओपन ऑफर्स देऊन प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, पिचर आणि शार्क यांच्यातील वादही अनेकदा पाहायला मिळाले आहेत. त्याचप्रमाणे, 'शार्क टँक इंडिया सीझन 2' च्या ताज्या एपिसोडमध्ये, जेव्हा Shaadi.com चे संस्थापक अनुपम मित्तल एका स्पर्धकावर इतके चिडले की त्यांनी कोट्यावधी रुपयांचा चेक फाडला आणि फेकून दिला.
शार्क टँकच्या ताज्या भागात, दोन स्पर्धक मसाल्याचा ब्रँड ‘झॉफ’साठी गुंतवणूक घेण्यास आले. दोघेही त्यांच्या ब्रँडची डील सांगतात आणि जजना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. सर्वप्रथम, नमिता थापर यांनी विचारले की जर आधीच इतके मोठे मसाल्यांचे ब्रँड बाजारात आहेत, तर तुम्ही लोकांना तुमच्याकडे आकर्षित करून शकाल का? या प्रश्नावर पिचर्सनी शार्कला सडेतोड उत्तर दिलं. यानंतर सर्व जज या मसाल्याच्या ब्रँडमध्ये पैसे गुंतवण्यासाठी एकमेकांशी भांडताना दिसतात.
दिली ऑफर
अखेरीस, जेव्हा शार्क या पिचरच्या ब्रँडमध्ये गुंतवणूक करण्यास तयार होतात तेव्हा ते स्वतःच्या ऑफर देऊ लागतात. सर्वप्रथम, अनुपम मित्तल 1 ते 2 कोटींची ऑफर देतात आणि बाकीचे जज अमन गुप्ता, विनिता सिंग आणि अमित जैन चर्चेप्रमाणे आपल्या ऑफर्स बदलताना दिसतात.
Join the Sharks for a night of pure fun at the pitch sessions of #Zoff, #DesiToys, and #CloudWorx. Tune in tonight at 10 pm.#SharkTankIndia season 2 streaming now on Sony LIV, also available on Sony Entertainment Television. pic.twitter.com/06lIrbU5St
— Sony LIV (@SonyLIV) February 8, 2023
अनुपम मित्तल यांनी चेक फाडला
व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की सर्व शार्कच्या ऑफर ऐकूनही पिचर काहीही ठरवत नाहीत. यावर अनुपम मित्तल संतापतात आणि रागाने म्हणतात - तुम्हाला कोणत्याही पैशांची गरज नाही, तुम्ही इथे फक्त मार्केटिंगसाठी आला आहात. मी बराच वेळ माझा चेक घेऊन बसलो आहे, तुम्ही गोंधळलेले आहात, असे म्हणत अनुपम मित्तल आपला चेक फाडतात.