Shark Tank मध्ये 'पुरणपोळी घर' च्या भास्कर यांची ऑफर नाकारली, काय म्हणाले शार्क्स ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 03:47 PM2023-01-13T15:47:27+5:302023-01-13T15:52:34+5:30
सध्या टीव्हीवर सर्वात जास्त पाहिला जाणारा शो म्हणजे शार्क टॅंक इंडिया.
Shark Tank India : सध्या टीव्हीवर सर्वात जास्त पाहिला जाणारा शो म्हणजे शार्क टॅंक इंडिया. या शो ची प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. या शो मध्ये येणाऱ्या स्टार्टअप क्षेत्रातील उद्योजकांच्या बिझिनेसमध्ये शार्क टॅंक मधील शार्क्स गुंतवणूक करायचे की नाही ते ठरवतात. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये भास्कर केआर नावाचे एक उद्योजक आले. त्यांनी शून्यातून कसा उद्योग उभा केला हे शो मध्ये उलगडण्यात आले. मात्र शार्क्स मे त्यांची ऑफर नाकारली आहे.
'पुरणपोळी' घर
कर्नाटकचे रहिवासी असलेले भास्कर यांचा फूड बिझिनेस आहेत. त्यांनी सुरु केलेल्या ब्रॅंडचे नाव भास्कर 'पुरणपोळी घर' असे आहे. सध्या त्यांची ही फूडचेन कर्नाटक आणि महाराष्ट्रातच आहे. मात्र त्यांना संपूर्ण देशभरात पुरणपोळी घर पोहोचवायचे आहे.
भास्कर म्हणतात, 'आज मी हा कोट्यावधींचा बिझिनेस उभा केला आहे. कधकाळी मी कर्नाटकात एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला होतो. त्यानंतरही अनेक छोट्या मोठया नोकऱ्या केल्या. त्यानंतर हे पुरणपोळी घर सुरु केले. सुरुवातीला मी स्वत:च पुरणपोळी बनवून विकायचो. लोकांना माझ्या हातची पुरणपोळी आवडायला लागली. यानंतर हळूहळू हा बिझिनेस वाढत गेला. कर्नाटक नंतर महाराष्ट्रातही पुरणपोळी घर सुरु केले.
यावर जज म्हणाले, 'भास्कर तुमचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. पण सध्या तुमचा व्यवसाय चांगला फायद्यात आहे. इतरांनी तुमच्या उद्योगात गुंतवणूक करण्याची काय गरज' असं म्हणत त्यांनी गुंतवणूकीस नकार दिला.