माझ्या नवऱ्याची बायको फेम शर्मिला राजाराम शिंदेच्या घरी झाले गोंडस पाहुण्याचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 18:47 IST2021-06-09T18:46:48+5:302021-06-09T18:47:28+5:30

शर्मिलाने सोशल मीडियाद्वारे ही गुड न्यूज तिच्या चाहत्यांना सांगितली आहे.

sharmila rajaram shinde sister blessed with baby boy | माझ्या नवऱ्याची बायको फेम शर्मिला राजाराम शिंदेच्या घरी झाले गोंडस पाहुण्याचे आगमन

माझ्या नवऱ्याची बायको फेम शर्मिला राजाराम शिंदेच्या घरी झाले गोंडस पाहुण्याचे आगमन

ठळक मुद्देमाझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत जेनीची भूमिका साकारून अभिनेत्री शर्मिला राजाराम घराघरात पोहचली.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील जेनी म्हणजेच शर्मिला राजारामच्या घरी गोंडस पाहुण्याचे आगमन झाले असून तिने सोशल मीडियाद्वारे ही गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे. तिच्या बहिणीला मुलगा झाला असून ती मावशी बनली असल्याने तिला प्रचंड आनंद झाला आहे.

शर्मिलाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यासोबत लिहिले आहे की, मी रडत नाहीये तर माझ्या डोळ्यांत काहीतरी गेले आहे. माझ्या आयुष्यात एक गोंडस चिमुकला आला आहे. मी मावशी झाले आहे.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत जेनीची भूमिका साकारून अभिनेत्री शर्मिला राजाराम घराघरात पोहचली. या मालिकेतील साध्या आणि प्रामाणिक जेनीने रसिकांच्या मनात घर केले होते.

शर्मिलाने या मालिकेत काम करण्यापूर्वी पुढचं पाऊल या मालिकेत रूपाली म्हणून खलनायिकेची भूमिका साकारली होती. या मालिकेतील भूमिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तिने मेरे साई या मालिकेत देखील काम केले आहे. 

Web Title: sharmila rajaram shinde sister blessed with baby boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.