सारं काही तिच्यासाठी! शर्मिष्ठा राऊत पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, साकारणार महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 19:21 IST2023-07-17T19:10:26+5:302023-07-17T19:21:13+5:30

'अबोली' या मालिकेत काम करत असताना तिनं अचानक मालिकेतून एक्झिट घेतली अन् स्वत: प्रोडक्शन हाऊस सुरू केल्याची गुड न्यूज तिनं चाहत्यांना दिली.

Sharmishtha raut come back in sare kahi tujhyach sathi new serial | सारं काही तिच्यासाठी! शर्मिष्ठा राऊत पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, साकारणार महत्त्वाची भूमिका

सारं काही तिच्यासाठी! शर्मिष्ठा राऊत पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, साकारणार महत्त्वाची भूमिका

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने काही महिन्यांपूर्वी निर्माती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेची निर्मिती शर्मिष्ठाने केली आहे.  अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने  'मन उधाण वाऱ्याचे' मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करत प्रेक्षकांची मनं जिंकली. 'अबोली' या मालिकेत काम करत असताना तिनं अचानक मालिकेतून एक्झिट घेतली अन् स्वत: प्रोडक्शन हाऊस सुरू केल्याची गुड न्यूज तिनं चाहत्यांना दिली. आता पुन्हा एकदा शर्मिष्ठा मालिकेत झळकताना दिसणार आहे. 

 शर्मिष्ठा राऊत नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 'सारं काही तिच्याचसाठी' असं तिच्या नव्या मालिकेचं नाव आहे. हि गोष्ट आहे २ सख्ख्या बहिणींची ज्या गेले २० वर्ष एकमेकींना भेटल्या नाहीत. मोठी बहीण उमा तळकोकणात आपल्या सासरी सुखाने नांदतेय आणि लहान बहीण संध्या तिच्या मुली सोबत गेले २० वर्ष लंडनमध्ये स्थायिक आहे. दोघींच्या आयुष्यात २० वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली ज्यामुळे त्या एकमेकींना कायमच्या दुरावल्या. पण म्हणतात ना रक्ताची नाती कितीही लांब गेली तरी मनातला जिव्हाळा कमी होत नाही. आजही असा एक दिवस जात नाही जेव्हा उमा आणि संध्याला एकमेकींची आठवण येत नसेल. उमाचा नवरा रघुनाथ खोत हे गावातील मोठे प्रस्थ आहे. 

ते स्वदेशीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. २० वर्षांपूर्वी रघुनाथरावांना दिलेल्या वचनाखातर उमाने आपल्या लहान बहिणीशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले. पण समजा २० वर्ष पाळलेले वचन काही कारणामुळे उमाला मोडावे लागले तर? स्वदेशीचा पुरस्कार आणि परदेशी गोष्टींचा विरोध करणारे रघुनाथ, लंडनमध्ये वाढलेल्या संध्याच्या मुलीला स्वीकरतील का? २ बहिणींमध्ये असे काय घडलेले ज्यामुळे दोघी एकमेकींना कायमच्या दुरावल्या? अशाच दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेले पाऊल म्हणजे "सारं काही तिच्यासाठी "  रघुनाथ रावांच्या भूमिकेत जेष्ठ अभिनेते 'अशोक शिंदे' दिसणार आहेत, उमाची भूमिका साकारणार आहे 'खुशबू तावडे' आणि संध्याच्या भूमिकेतून 'शर्मिष्ठा राऊत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Sharmishtha raut come back in sare kahi tujhyach sathi new serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.