फूल टू धमाल अन् मॅडनेस! सहकुटुंब सहपरिवार दुबईला गेलेला शशांक केतकर, रमला जुन्या आठवणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 17:00 IST2025-04-21T16:59:48+5:302025-04-21T17:00:25+5:30

आईबाबा, बहीण आणि पत्नी अशी सहकुटुंब सहपरिवार शशांक केतकरने दुबईवारी केली होती.

shashank ketkar dubai trip with family shared old video | फूल टू धमाल अन् मॅडनेस! सहकुटुंब सहपरिवार दुबईला गेलेला शशांक केतकर, रमला जुन्या आठवणीत

फूल टू धमाल अन् मॅडनेस! सहकुटुंब सहपरिवार दुबईला गेलेला शशांक केतकर, रमला जुन्या आठवणीत

शशांक केतकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून शशांकला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अनेक मालिका, सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही शशांक महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसला. सध्या शशांक मुरांबा या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही वर्षांपूर्वीच बिझी शेड्युलमधून वेळ काढत शशांकने दुबई गाठली होती. 

आईबाबा, बहीण आणि पत्नी अशी सहकुटुंब सहपरिवार शशांक केतकरने दुबईवारी केली होती. याचा व्हिडिओ शशांकची बहीण दीक्षा केतकर हिने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शशांक कुटुंबीयांसह दुबईत मज्जा मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत दीक्षा म्हणते, "शेवटी आठवणीच कायम राहतात". या व्हिडिओत शशांकचा मॅडनेसही पाहायला मिळत आहे.  


दरम्यान, शशांकच्या पर्सनल लाइफबद्दल बोलायचं झालं तर २०१७ साली प्रियांका ढवळेसोबत लग्न करत संसार थाटला. त्यांना ऋग्वेद हा मुलगा आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांना कन्यारत्नही प्राप्त झालं आहे. शशाकंची बहीण दीक्षादेखील कलाविश्वात कार्यरत आहे. दीक्षाने तू सौभाग्यवती हो मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली होती. काही नाटकांमध्येही तिने काम केलं आहे. 

Web Title: shashank ketkar dubai trip with family shared old video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.