लंडनच्या थंडीत शशांक केतकरला भेटली त्याची 'आई', Video शेअर करत म्हणाला, 'खूप आनंद...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 16:48 IST2023-04-23T16:48:00+5:302023-04-23T16:48:52+5:30
सर्वांचा लाडका 'श्री' म्हणजेच शशांक केतकर सध्या लंडनमध्ये आहे.

लंडनच्या थंडीत शशांक केतकरला भेटली त्याची 'आई', Video शेअर करत म्हणाला, 'खूप आनंद...'
सर्वांचा लाडका 'श्री' म्हणजेच शशांक केतकर (Shashank Ketkar) सध्या लंडनमध्ये आहे. सिनेमाच्या शूटसाठी शशांक लंडनला गेला आहे. सध्या तो तिथे धम्माल करतोय तसंच लंडनची थंडी अनुभवतोय. शशांक स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' या मालिकेत अक्षयची भूमिकाही साकारत आहे. यामध्ये त्याच्या आईची भूमिका अभिनेत्री सुलेखा तळवलकरने (Sulekha Talwalkar) केली आहे. आणि सरप्राईज बघा लंडनमध्ये अचानक शशांकची भेट सुरेखा यांच्याशी झाली आहे.
शशांक केतकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत तो म्हणतो, नमस्कार मी सध्या माझ्या फिल्मच्या शूटसाठी लंडनला आलो आहे. धम्माल करतोय, खूप थंडीही आहे. इथे काही मित्रमंडळी भेटतात पण मला माझी आई सुद्धा इथे भेटली आहे. मुरांबा या मालिकेतली माझी आई...सुलेखाताई..ती सुद्धा इथे आली आहे नाटकाच्या प्रयोगासाठी. '
तर सुलेखा तळवलकर म्हणतात, 'मला शशांक विंगेत येऊन भेटला. मला इतकं छान वाटलं त्याला पाहून. लंडनमध्ये येऊन माझा स्वत:चा लेक मला भेटतोय. मी खूप खूश झालीए.आता आम्ही इतके बिंधास्तपणे बोलतोय पण आम्ही कुडकुडतोय हा..खूप थंडी आहे.'
शशांक सध्या त्याच्या आगामी 'कैरी' या सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे. या सिनेमातून पहिल्यांदाच सायली संजीवसोबत त्याची जोडी बघायला मिळणार आहे. तर सुलेखा तळवलकर या 'खरं खरं सांग' या त्यांच्या नाटकाच्या प्रयोगासाठी लंडनला गेल्या आहेत.