शशांक केतकरचा साताऱ्यातला वाडा पडणार, पोस्ट शेअर करत म्हणाला, 'आता फक्त आठवणी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 09:52 AM2023-06-12T09:52:56+5:302023-06-12T09:53:40+5:30

गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी. शशांकच्या वाड्याचे सुंदर Photos

shashank ketkar satara heritage home soon to be demolished shared emotional post | शशांक केतकरचा साताऱ्यातला वाडा पडणार, पोस्ट शेअर करत म्हणाला, 'आता फक्त आठवणी...'

शशांक केतकरचा साताऱ्यातला वाडा पडणार, पोस्ट शेअर करत म्हणाला, 'आता फक्त आठवणी...'

googlenewsNext

आपलं बालपण जिथे गेलं त्या जागेशी शेवटपर्यंत आपलं खास नातं असतं. जुनं घर, ती शाळा, खेळण्याचं मैदान आणि बरंच काही नेहमी आठवणीत राहणारं आहे. पण जुनं पाडून नवीन उभं करण्याची प्रथाही आहेच. त्यामुळे त्या जुन्या गोष्टी नंतर केवळ आठवण म्हणून राहतात. असंच काहीसं घडलं आहे मराठी अभिनेताशशांक केतकरसोबत (Shashank Ketkar) शशांकचं बालपण गेलं तो त्यांचा साताऱ्यातील वाडा आता पाडण्यात येणार आहे. त्याआधी शशांकने कुटुंबासह वाड्याला भेट दिली असून खास पोस्ट शेअर केली आहे.

शशांकचा जन्म साताऱ्यात झाला. त्याचं बालपणही तिथेच गेलं. साताऱ्यात नेने चौक येथे त्यांचा नेने वाडा आहे. अगदी जुनं दगड विटांचं बांधकाम, छोट्या खिडक्या, उभे दरवाजे असाच सुंदर हा शशांकचा वाडा आहे. शशांकने वाड्यातील सुंदर देवघराचाही फोटो शेअर केला आहे. वाड्याचे फोटो शेअर करत त्याने लिहिले, 'सातारा. ज्या वाड्यात माझा जन्म झाला तो हा नेने वाडा. खूप आठवणी आहेत या वाड्यातल्या. काही महिन्यात आता हा पाडला जाईल आणि तिथे एका घरा ऐवजी, अनेक घरांची सात आठ मजली ईमारत उभी राहील. आता हा वाडा फक्त काही फोटोस आणि आठवणीतच शिल्लक राहिल.'

शशांकच्या या पोस्टवरुन नेटकऱ्यांनीही कमेंट करत आपल्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.'खूप सुंदर वाडा आहे प्लीज तोडू नये. आपली जुनी संस्कृती आपणच तोडत चाललोय. पुन्हा असा वाडा बघायला मिळणार आहे का? ऐतिहासिक वास्तू आपणच जपायला हव्यात' अशी कमेंट करत वाडा न पाडण्याचा सल्ला एकाने दिला आहे.

Web Title: shashank ketkar satara heritage home soon to be demolished shared emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.