'रस्ते, शहर, परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली...', रस्त्यावरचा कचरा पाहून संतापला शशांक केतकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 11:55 AM2024-01-15T11:55:28+5:302024-01-15T12:07:04+5:30

शशांक केतकर उत्तम अभिनेता तर आहेच. पण त्याला सामाजिक भानही आहे.

Shashank Ketkar Shared Mumbai Waste Problem And Pollution Video | 'रस्ते, शहर, परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली...', रस्त्यावरचा कचरा पाहून संतापला शशांक केतकर

'रस्ते, शहर, परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली...', रस्त्यावरचा कचरा पाहून संतापला शशांक केतकर

मराठी अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) 'होणार सून मी या घरची' मालिकेतून घराघरात पोहोचला. त्याला शशांक कमी आणि श्री नावानेच जास्त ओळखलं जातं. शशांक उत्तम अभिनेता तर आहेच. पण त्याला सामाजिक भानही आहे. तो अनेकदा सामाजिक विषयांवर मत मांडतो.सेलिब्रिटी असल्याचा बडेजाव न दाखवता तो सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडतो. तसंच लोकांचं काही चुकत असेल तर तेही बिंन्धास्त दाखवतो. नुकतंच शशांकने केलेली एक पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.


शशांक केतकरने त्याच्या इन्स्टाग्रामवर मुंबईतील रस्त्यालगत ठेवण्यात येणाऱ्या कचरापेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे.  व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शशांकने आपलं मत मांडत मुंबई महानगरपालिकेला टॅग केलं आहे. त्याने लिहलं, 'रस्ते, शहर, परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली आणि महानगर पालिकेची जबाबदारी आहे. जिथे या ओळी लिहिल्या आहेत, तिथेच तुटलेल्या मोडलेल्या कचर्याच्या २ पेट्या ठेवल्या आहेत! होय आपण हे एकत्र करू शकतो! पण प्रश्न हा आहे की खरचं आपली इच्छा आहे का'.

 तसेच  #reality #dirty #mumbai #polution #bmc @my_bmc #हेनाहीचालणार #येनाहीचलेगा, असे हॅशटॅग त्याने दिले. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहलं, 'मला वाटतं की आपला कचरा आपण कचराकुंडीत टाकावा ही सर्वस्वी आपली जबाबदारी नाही का? आणि फक्त सरकारच्या चुका दाखवून काय होणारे? प्रत्येक व्यक्ती बदलेल तेव्हा देश बदलेल... तसंही रामराज्य येतंय बुद्धीही मिळेल आपल्याला.. प्रार्थना करू रामाकडे'. तर आणखी एकाने म्हटलं, 'लोकांनाही आपल्या जबाबदारीची जाणिव असावी मुंबईत प्रत्येक ठिकाणी अशीच अवस्था आहे'.

 शशांकने पोस्टमधून बेजबाबदार लोकांना चपराक लगावली आहे. शशांकच्या पोस्ट अनेकदा अशाच बेधडक असतात. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, 
शशांक स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' मालिकेतअक्षय मुकादम ही भूमिका साकारत आहे. यामध्ये त्याची आणि रमाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. 

Web Title: Shashank Ketkar Shared Mumbai Waste Problem And Pollution Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.