Video: लेकासोबत शशांक केतकरही झाला लहान, ठाण्यात फिरत बालपणीच्या आठवणीत रमला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 19:46 IST2024-02-16T19:45:12+5:302024-02-16T19:46:50+5:30
शशांक केतकरचा ठाणे शहरात फेरफटका

Video: लेकासोबत शशांक केतकरही झाला लहान, ठाण्यात फिरत बालपणीच्या आठवणीत रमला
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरची (Shashank Ketkar) सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट ही खासच असते. कधी तो चाहत्यांना हसवतो तर कधी काही ना काही सामाजिक संदेश उपदेश करताना दिसतो. आता शशांकने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ठाणे शहरात फेरफटका मारत त्याने लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. शशांकचा लहान मुलगा ऋग्वेद सोबत तो आणि त्याची पत्नी प्रियंकाही लहान झाले आहेत.
काय आहे शशांकची पोस्ट?
ठाणे शहरात फिरतानाचा व्हिडिओ शेअर करत शशांकने लिहिले, " कधी कधी आपण आपल्याच शहरात फिरायचं विसरतो. काल सुट्टी मिळाली… ठरवून मी आणि प्रियांका अगदी ऋग्वेद च्या वयाचे होऊन आमच्या ठाण्यात फिरलो."
तो पुढे लिहितो, "मी इयत्ता १० वी पर्यंत ठाण्यात होतो. शाळेत असताना मित्रांबरोबर तलावपाळी ला यायचो, राम मारुती रोड वर फिरायचो, भेळ खायचो, मिसळ खायचो. त्यानंतर होणार सून च अनेकदा शूटिंगही इथेच केलं! काल त्या सगळ्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देता आला."
शशांकने खास क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहेत. सुट्टीचा पुरेपुर आनंद घेत त्याने कुटुंबाला वेळ दिला आहे. शशांक सध्या स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' या मालिकेत दिसत आहे. यामध्ये त्याची आणि रमाची केमिस्ट्री मस्त जुळून आली आहे. प्रेक्षकांना मालिका प्रचंड आवडते. याशिवाय शशांक बॉलिवूडमध्येही छोट्या भूमिका साकारतोय. 'स्कॅम' सीरिजनंतर तो नुकताच इम्रान हाश्मीच्या धर्मा प्रोडक्शनखालील'शोटाईम' सिनेमातही झळकला आहे.